नगरमधील संपादकांना कोटीचे टार्गेट...

नगरमध्ये सध्या मीडियात अनिष्ठ प्रथा सुरू झाली आहे. जो जास्त जाहिराती मिळवून देईल तो संपादक...ज्यांना चार ओळी नीट लिहिता येत नाहीत,त्याला संपादक केले जाते.अशाच एका पत्रकाराला एका पेपरचे वृत्तसंपादक करण्यात आले आहे.जाहिरातीचे काम संपताच तो बातम्यासाठी बीट वार्ताहराप्रमाणे फिरत आहे.
सध्या सर्वच वृत्तपत्राचे वर्धापनदिन सुरू झाले आहेत. अनेक बड्या संपादकांना कोटीचे टार्गेट दिले गेले आहे. विशेष म्हणजे हे टार्गेट जाहिरात व्यवस्थापकांना नव्हे संपादकांना दिले गेले आहे. संपादक मंडळी आता बातम्यांवर संस्करण करण्याऐवजी जाहिरातीसाठी पुढाऱ्यांकडे चकरा मारीत आहेत.गतवर्षी काही पेपरच्या संपादकांनी कोटीच्या टार्गेटपोटी पुढाऱ्यांना न विचारता जाहिराती टाकल्या.त्याची बिले अजून मिळाली नाहीत.मग काय ज्यांनी बिल दिले नाहीत,त्या पुढाऱ्यांच्या विरोधात खोट्या बातम्या देण्याचे सत्र सुरू झाले आहे.
सध्या संपादकांच्या ससेमिऱ्यामुळे नगरमधील अनेक पुढाऱ्यांचे फोन स्वीच ऑफ लागत आहेत.धन्य ते संपादक आणि धन्य ती नगरची मीडिया...