आता लोकमतच्या वार्तासंकलक ते मुख्य उपसंपादकांना द्यावी लागणार पात्रता परीक्षा...

नागपूर - लोकमतच्या नागपूर प्रशासनाने परवा एक नविन फतवा काढला आहे. या फतव्यानुसार वार्तासंकलक, उपसंपादक, मुख्य उपसपादक यांना पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा ६ किंवा ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
 नागपूरनंतर औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे,मुंबई आदी विभागातही ही परीक्षा होणार आहे. जे या पात्रता परिक्षेत नापास होतील, त्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा लोकमत प्रशासनाचा इरादा आहे.पात्रता परिक्षेमुळे लोकमतच्या संपादकीय विभागातील लोकांवर एक प्रकारचे गंडातर आले आहे. या परिक्षेमुळे सध्या लोकमतमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
आम्हाला बातमी लिहायला सांगा किंवा बातमी शोधायला सांगा पण पात्रता परिक्षा द्यायला सांगू नका, असे संपादकीय विभागाच्या लोकांचे म्हणणे आहे. बातमीचा आणि परीक्षेचा काय संबंध ? असा सूर लोकमतमध्ये निघत आहे.
काही तरी निमित्त करून, आम्हाला काढण्याचा हा कुटील डाव असून, हा डाव आम्ही उधळून लावू,असे लोकमत कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.

ता.क.- लोकमतमध्ये संपादकीय विभागाशिवाय वितरण,जाहिरात, प्रशासन, निर्मिती,हिशोब असे विभाग आहेत.मात्र संपादकीय विभागासाठीच परिक्षा का? अन्य विभागाला परिक्षा का नाही? याचे उत्तर बाबूजी देतील का ?