IBN - लोकमतला लवकरच अनेकांचा 'जय महाराष्ट्र'

मुंबई - १ मे २०१३ रोजी सुरू होणा-या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे Editor in Chief  म्हणून मंदार फणसे जॉईन झाले आहेत.फणसेच्या एन्ट्रीमुळे आय.बी.एन. लोकमतमध्ये खळबळ उडाली असून,अध्र्यापेक्षा जास्त कर्मचारी आय.बी.एन.लोकमतला जय महाराष्ट्र करणार असल्याची पक्की खबर मिळाली आहे.
ज्यावेळी मुंबईत आय.बी.एन.लोकमत न्यूज चॅनल सुरू झाले, तेव्हा निखिल वागळे Editor in Chief  तर मंदार फणसे, सुभाष शिर्के News Editor म्हणून जॉईन झाले होते. या त्रिकुटामुळे आय.बी.एन.लोकमतने एक दर्जा प्राप्त केला होता.मात्र वागळेंच्या हुकूमशाहीमुळे शिर्केनी एक वर्षातच आय.बी.एन.लोकमत सोडले.मात्र फणसेंनी कोंडमारा सहन करीत कसेतरी चार वर्षे काढली.फणसेंनी राजीनामा देण्याअगोदर आय.बी.एन.लोकमतने किमान १०० पेक्षा अधिक जणांना काढून टाकले होते.त्यात बहुतांश फणसेंचे समर्थक होते.त्यामुळे फणसे कमालीचे नाराज होते.
आय.बी.एन.लोकमतचा राजीनामा दिल्यानंतर फणसेंनी भारत फॉर इंडिया ही वेबसाईट काढून, आय.बी.एन.लोकमतचा आपला  जुना ग्रुप टिकवून ठेवला.मात्र फणसेचे नशिब आणखी फळफळले आहे.त्यांना जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने Editor in Chief केले आहे.
फणसे Editor in Chief म्हणून जॉईन होताच,आय.बी.एन.लोकमतमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण आय.बी.एन.7 चे ब्युरो चिफ रवी आंबेकर अगोदरच  इनपूट हेड म्हणून जॉईन झाले आहेत.आता फणसेमुळे अध्र्यापेक्षा जास्त कर्मचारी, रिपोर्टर, जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
निखिल वागळेंच्या हुकूमशाही कारभारामुळे अनेक कर्मचारी दु:खावले आहेत.वागळेंचे बगलबच्चे सोडले तर आय.बी.एन.लोकमतमध्ये कोणीही सुखी किंवा समाधानी नाही.ज्यांना पगारवाढ मिळाली नाही,किंवा ज्यांना कोणी विचारत नाही, ते सर्व जय महाराष्ट्रच्या वाटेवर आहेत.आता निमंत्रण कधी येते,याचीच ते वाट पहात आहेत.त्यामुळे निखिल वागळे गांगरून गेल्याची चर्चा चालू आहे.
 येत्या महिन्याभरात आय.बी.एन.लोकमतचा निम्मा स्टॉप जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये दिसेल,हे आमचे भाकीत आहे.हे भाकीत नेहमीप्रमाणे खरे ठरणार, हे मात्र नक्की.
मंदार फणसेEditor in Chief, रवी आंबेकर इनपूट हेड आणि मुळशीदार भोईटे आऊटपूट हेड या त्रिकुटामुळे  जय महाराष्ट्र न्यूज चॅनलची मोठी चर्चा सुरू झाली आहे. हे चॅनल आता प्रत्यक्षात कसा आकार घेणार, याकडे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लक्ष वेधले आहे.

जाता - जाता : IBN - लोकमत मध्ये काही  ''बडव्यां''च्या  अति हस्तक्षेपामुळे स्ट्रीन्जर्स चे नुकसान...स्टोरीज लागत नाहीत ....  मोठ्या बातम्या लागत नाहीत ( किल केल्या जातात ) अनेक बातम्यावर इन्पुट वरील माणसांचा प्रेस्टीज इशु होतो......इन्पुट वर असलेली काही मंडळी स्वतः मालक असल्या सारखी वागतात...स्ट्रीन्जर्सशी उर्मट पणे  बोलतात ..... बूम माईक आय डी  मिळत नाही ..आयकार्ड शाळेतल्या मुलांना मिळतात त्यापेक्षा हि हलक्या दर्ज्याचे.....अनेक स्ट्रीन्जर्सने दिला  जय महाराष्ट्र ला इंटरव्ह्युव....