अकोला-
  दिव्य मराठीने अकोल्यात आवृत्ती प्रकाशनाची जोरदार तयारी सुरु केली आहे. 
 संपादकीय विभागासाठी टीम तयार होत असून, अनेकांना ऑफर लेटर मिळाले आहेत. 
काहींना  अदयाप  ऑफर लेटर मिळालेले नसल्याने ते काळजीत पडले आहेत. काहींना 
मनाप्रमाणे पद तर काहीना अपेक्षेप्रमाणे वेतन देऊ केले असून काहींचा 
अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे अकोल्यातल्या पत्रकारामध्ये कही ख़ुशी कही गम
 अशी स्थीति निर्माण झाली आहे.
  मुख्य वार्ताहरपदी नवख्या सचिन देशपांडे यांची नेमणूक झाली आहे. 
लोकमत मधील अजय डांगे, सदानंद शिरसाट, नितीन कोंडलीकर, राजू चिमणकर, 
यांच्यासह सहा पत्रकारांना ऑफर लेटर देण्यात आले आहे. इतरांनी मात्र लोकमतच
 बरा म्हणत दिव्यकडे पाठ फिरविली आहे, सकाळमधून    मनीष जोशी, श्रीकांत 
पाचकवडे, श्रीकांत जोगळेकर,याच्यासह तिघांना डीएमने घेतले असून, देशोन्नती 
मधील आशिष गावंडे , सचिन राऊत यांना ऑफर लेटर देण्यात आले आहेत.   मटाचे वार्ताहर प्रबोध देशपांडे
 यांनाही  संधी मिळाली आहे.  
 पुण्यनगरीचे 
जिल्हा प्रतिनिधी अनिल माहोरे यांनी पद आणि वेतनाची अपेक्षा पूर्ण होत 
नसल्यामुळे डीएम मध्ये जाण्याचे टाळले आहे.  पुरुषोत्तम आवारे पाटील यांना 
दिव्यमध्ये संधी मिळाली नसून, सकाळचे वरिष्ठ वार्ताहर  विशाल राजे यांनीही 
डीएम कडे पाठ फिरविली असल्याचे वृत्त आहे, मुळचे अकोला जिल्ह्यातील असलेले 
आणि सकाळ, लोकमत मार्गे पुढारीत गेलेले मंगेश देशमुख यांना वृत्त संपादक 
किवा मुख्य उपसंपादक पदाची अपेक्षा असताना त्यानाही दुसऱ्याच पदाची ऑफर 
देण्यात आल्यामुळे तेही दिव्यपासून लांबच राहिले आहेत.  एकंदरीत 
अकोल्यासाठी दिव्य मराठीने निवडलेली संपादकीय टीम फारशी मजबूत दिसत नाही. 
पत्रकारितेमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या जेष्ठ, अनुभवी पत्रकारांची निवड 
करण्यापेक्षा संपादक अभिलाष खांडेकर यांनी नव्या किवा कमी अनुभव 
असलेल्यांना झुकते माप दिल्याचे दिसते ,  अकोला शहर कार्यालयासाठी करण्यात 
आलेल्या नियुक्त्या बघता त्यामध्ये पत्रकारितेमध्ये नाव गाजविलेल्या 
धडाडीच्या अनुभवी पत्रकारांपेक्षा नव्या चेहऱ्यांना किवा कमी अनुभव 
असलेल्यांचा भरणा अधिक आहे.  अश्या परिस्थितीत दिव्य मराठीला लोकमतशी टक्कर
 देणे अशक्य दिसत आहे.  कारण लोकमतमध्ये अनुभवी पत्रकारांची संख्या 
दिव्याच्या तुलनेत अधिक असून, अकोला शहर कार्यालयात लोकमत अधिक एक-दोन 
दमदार पत्रकारांची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे  डीएम समोर मोठे आव्हान 
आहे.  सकाळी रिपोर्टरची संख्या वाढविणार असल्याचे वृत्त आहे.  एकंदरीत 
डीएमने नेमलेल्या पत्रकारांच्या नावावर नजर टाकली तर  अनेकांची लायकी 
नसूनही त्यांना संधी मिळाली असल्याचे दिसते, दुसरीकडे अनेक चांगल्या 
पत्रकारांना संधीच देण्यात आली नसून, काहींना त्यांना नको असलेल्या पदाची 
ऑफर देण्यात आल्यामुळे अकोल्यातल्या पत्रकारांमध्ये काही ख़ुशी कही गम अशी 
स्थिती आहे…।
राऊत यांना टाळण्यासाठी अनेकांची फिल्डिंग !
बुलडाणा - डी.एम.चे बुलडाणा ब्युरो चिफ म्हणून निलेश जोशी यांची निवड...निलेश जोशी सध्या औरंगाबादच्या पुण्यनगरीत कार्यरत...
राऊत यांना टाळण्यासाठी अनेकांची फिल्डिंग !
अकोला - 
 अकोल्याच्या पत्रकारितेत गेल्या काही वर्षापासून अतिशय घाणेरडे प्रकार 
सुरु आहेत, आपल्यापेक्ष्या सरस ठरणाऱ्या आणि उत्तम कागीरीच्या जोरावर 
पत्रकारितेत लौकिक प्राप्त करणाऱ्या पत्रकाराला खोट्या तक्रारी करून बदनाम 
करणारे एक टोळकेच अकोल्यात सक्रिय आहे.  याच टोळक्याने गत 16 वर्षापासून 
अकोल्यात पत्रकारितेत चमकदार कामगिरी करणाऱ्या अविनाश राऊत यांना काहीनी 
अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.  राऊत याच्यावर जळणाऱ्या काही तोडीबाज 
पत्रकारांनी खोट्या तक्रारी करून बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले आहे.  काही 
 त्यांच्या मुळावर उठले असल्याचे काही कारवयावरून  दिसते. अकोला सेक्स 
स्कडल सारखी अनेकानेक प्रकरणे उजेडात आणून सतत चर्चेत राहिलेल्या राऊत 
यांची दिव्य मराठीमध्ये नेमणूक होऊ नये यासाठी काही पत्रकार देव पाण्यात 
बुडउन बसले आहेत. कारण राऊत यांची नेमणूक झाल्यास ते पुन्हा चर्चेत येतील 
आणि आपण मागे पडू अशी भीती त्यांना असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध खांडेकर 
यांच्याकडे खोट्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. अभिलाष खांडेकर यांनी राऊत 
यांना अकोल्यातील मुलाखती होण्यापूर्वी  चर्चेसाठी बोलाविले होते. तेव्हा 
त्यांना  32 हजार दरमहा वेतन आणि मुख्य उप संपादक पद देण्याचे ठरले होते. 
त्यावेळी आपल्याला रिपोर्टिंग मध्ये इंटरेस्ट असून आपली नियुक्ती शहर 
कार्यालयात करावी अशी विनंती त्यांनी खांडेकरांना केली होती. त्यावर ठीक 
आहे बघतो, असे खांडेकरांनी राऊत यांना सागितले होते.  अकोल्यात मुलाखती 
आटोपल्या नंतर अनेकांनी काड्या  करून चक्रे फिरविली, अविनाश राऊत यांच्या 
बाबत खोट्या तक्रारी केल्या, परिणामी खांडेकरांनी त्यांना प्रेसवर मुख्य 
उपसंपादक पदावर रुजू होण्याचे सांगितले आहे… मात्रं  राउत यांना डेस्कवर 
काम करायचे नसल्याने त्यांनी अद्याप काहीच निर्णय घेतला नसल्याची 
खात्रीलायक माहिती आहे.  एकंदरीत काही चांडाळ पत्रकार अविनाश राऊत 
सारख्यांची वाट लावण्याच्या तयारीत असल्याचे दिसते
 .............................बुलडाणा - डी.एम.चे बुलडाणा ब्युरो चिफ म्हणून निलेश जोशी यांची निवड...निलेश जोशी सध्या औरंगाबादच्या पुण्यनगरीत कार्यरत...
 
 
 
 
