महाराष्ट्र टाइम्स जळगावात! वृत्तपत्रातूनच केली अधिकृत घोषणा...


महाराष्ट्र टाइम्स अर्थात ‘मटा’ने अखेर जळगावात पदार्पण केले आहे. वृत्तपत्रातील बातमीतूनच ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 100 वर्षांपूर्वी जळगावच्या पहिल्या कलेक्टरनी टाइम्स आॅफ इंडिया वाचल्याचा उल्लेखही या बातमीत आहे. वृत्तपत्राची घोषणा केली तरी संपादकीय जागा भरण्याबाबत ‘मटा’चा घोळ सुरूच आहे. ‘मटा’शी बोलणी करणारे अनेकजण अकोल्यात ‘दिव्य मराठी’ला जॉईन झाले आहेत; तर जळगावातील ‘दिव्य मराठी’वाल्यांनी ‘मटा’ला नकार कळविल्याने आता दुय्यम माणसांच्या जोरावरच सचिन अहिरराव यांना कसरत करावी लागेलसे दिसतेय. पन्नास रुपयात पाच महिने अशी ‘मटा’ने बुकिंग आॅफर दिली आहे. शिवाय वर एक पैसाही द्यायचा नाही. त्यामुळे ही ‘दिव्य’पेक्षा वाचकांनासाठी अधिक चांगली आॅफर आहे. 50 हजार कॉपीजचे बुकिंग टार्गेट आहे. सध्या जळगावात 700 अंक येतात. अर्थात 50 रुपयांच्या धनादेशाच्या बदल्यात 190 रुपये कमिशनमुळे विक्रेते/हॉकर्सची चांदी झाली आहे. सध्या ज्यांच्याकडे ‘मटा’ येतो त्यांच्याकडे सध्याचाच हॉकर पेपर टाकेल असे विक्रेता बैठकीत ठरलेय.