"मजीठिया"ची सुनावणी पुन्हा 7 जानेवारीपर्यंत लांबली

सुप्रीम कोर्टात सुरू असलेली "मजीठिया वेज बोर्ड" सुनावणी  पुन्हा लांबणी आहे.  पुढील सुनावणी नव्या वर्षात 7 जानेवारी रोजी होईल. त्याही दिवशी कर्मचारी युक्तिवाद सुरू राहणार असल्याने अंतिम निकाल लागण्याची शक्यता फारशी नसल्याचे सांगितले जात आहे.

पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारयांसाठी केंद्र सरकारने "मजीठिया वेज बोर्ड"  2009 मध्ये स्थापन केला. त्याच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या असल्या तरी टाईम्स, आनदबझार पत्रिका वैगेरे वृत्तपत्र व्यवस्थापनाने त्यास सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने यापूर्वीच प्रतिज्ञापत्र सादर करून आयोगाच्या सर्व शिफारसी स्वीकारल्याचे नमूद केले आहे. व्यवस्थापनांनीही युक्तिवाद पूर्ण केला असून कर्मचारी युक्तिवाद सुरू आहे. 12 डिसेंबर रोजीच्या सुनावणीत कर्मचारयांनी आपली बाजू मांडली. मात्र, हा  युक्तिवाद सुरूच आहे. वरिष्ठ अधिवक्ता कोलिन गोन्साल्विस यांनी ही बाजू मांडली. 7 जानेवारी रोजीही कर्मचारी युक्तिवाद सुरूच राहील. त्या दिवशी युक्तिवाद पूर्ण झाला तर पुढील तारखेला अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.