'रंगीला'चा पोपट झाला रे!

'रंगीला आैरंगाबादी'ची खबर आलीय मंडळी! रंगीला म्हणजे जबरदस्त प्रयोग'शील' व्यक्तिमत्त्व.  रात्रीचे त्यांचे एकेक प्रयोग म्हणजे भन्नाटच! भाजपाने 16 मे रोजी दिल्ली जिंकली तेव्हा 'रंगीला'ला प्रयोगाची व काहीतरी वेगळे करुन दाखविण्याची झिंग चढली. दिवसभर एका खासगी आर्टिस्टच्या अपार्टमेंटचे जिने चढ-उतरुन, पदरचे 25-30 हजार खर्चून 'नमों'चे फुल, ब्रॉडशीट, 8 कॉलम स्केच बनवून घेतले. स्केचवर फिगर, पॉईंटर्स सुपरइम्पोज करुन  'दिव्य'ला लाजवेल असे फ्रंट पेज जॅकेट तयार केल्याची घोषणा 'रंगीला'ने केली. ऑल एडिशनला ते घ्यावे म्हणून मुख्यालयी पाठविले. मात्र, महालक्ष्मी जणू कोपली. 'साहेबां'नी ते जॅकेट नाकारले. 'साहेब' फक्त नको बोलले; पण निरोप पुढे जाता-जाता 'पर्वती'मार्गे गेला- "छे! काय हा फालतूपणा? फेका ते, 'दादां'ना तिथे छान बनवून देताहेत म्हणे. ते नक्कीच 'सारस' ठरेल! तेच वापरा सगळीकडे" याला म्हणतात कोल्हापुरी धोबीपछाड अन् जोडीला सोलापुरी चटणीचा तडका! कुठे प्रयोगशीलता दाखवायचे याचे भान न राहिल्याने 'रंगीला'चे हसे झाले. त्यापेक्षा आपले 'शील'चे प्रयोगच बरे, असे रंगीला म्हणत असेल!


रंगिला औरंगाबादीची अशीही चाल...
मागच्या आठवड्यात आम्ही रंगिला औरंगाबादीने राजीनामा दिल्याचे वृत्त दिले होते.हे वृत्त खोटे असल्याचे मेसेस आम्हाला येत आहेत...त्याबद्दल बेरक्या दिलगिर आहे...
मंडळी त्याचे काय झाले, रंगिला औरंगाबादीला सध्या पद्श्री विचारत नाहीत.संपादक असूनही त्याला उपसंपादकाचे काम करावे लागते.दर्डा शेठच्या दारात चकरा मारूनही दर्डा शेठ पुसायला तयार नाहीत...मग रंगिलाने स्वत:च्या फायद्यासाठी उल्लू बनविले..त्याने त्याच्या जळगावमधील एका जुन्या सहकाऱ्यांला मी राजीनामा दिल्याचा मेसेस पाठविला.मग पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या एका मित्राने ही खबर आम्हाला पाठविली.आम्ही विश्वास ठेवायला तयार नव्हतो...मग आम्ही त्यांच्या कार्यालयात झेंडे लावणाऱ्यास विचारणा केली तर हो खरे आहे म्हणून पुष्टी दिली...म्हणून आम्ही ती बातमी दिली...
आता कळले की,ती बातमी चुकीची आहे...रंगिलाच हा डबल गेम होता...
1.पद्श्रीने आपल्याकडे विचारणा करावी,जावू नको म्हणून आग्रह करावा
2. दर्डा शेठने परत बोलवावे...
असो त्याची बातमी चुकली,त्याबद्दल जाहीर दिलगिरी... रंगिला औंरगाबादी विधानसभा आहे तिथेच काम करणार असून निवडणुका होईपर्यंत उपसंपादकाचेच काम करणार आहे...त्याला शुभेच्छा...आम्हाला उल्लूत काढले त्याबद्दल त्याचे अभिनंदन...