बेळगावच्या तरुण भारतला अनेक समस्यांनी ग्रासले

सध्या बेळगावच्या तरुण भारतला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. अनेक चांगले पत्रकार सोडून गेल्याने नवख्यांना पत्रकार करतो म्हणण्याची वेळ या पेपरवर आली आहे. तशी जाहिरातही त्यांनी प्रसिद्ध केली आहे . तर या पेपरच्या चिकोडी आवृत्तीची यापेक्षाही खराब परिस्थिती झाली आहे. निपाणी कार्यालयात चांगला उपसंपादक आणि वार्ताहर नसल्याने अनेक चुकीच्या बातम्या लागत आहेत. कधी अवैध वाहतूक करणार्यांना शासन मान्यता द्या म्हणून अर्धे पण लावले जात आहे, अग्निशामाक दलाची आलेली गाडी केवळ निवडणुकीपुरतीच म्हणून सांगून लोकांची दिशाभूल केली गेली, या पेपरने बालकामगार दिन ११ जुन रोजीच साजरा केला, तर युपीएससी च्या परीक्षेत ३५४ क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या युवक कधी आय ए एस झाला म्हणून तर कधी आय पी एस झाला म्हणून छापले जात आहे . मुळात तो युवक न आय ए एस आहे न आय पी एस . काही महिन्यापूर्वी एका अंगणवाडी शिक्षिकेच्या विरोधात शहानिशा न करताच चुकीची बातमी लावल्याने त्या शिक्षिकेला निलंबित व्हावे लागले . अनेकदा बातम्यांची शहानिशा न करताच चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या लावल्या जात आहेत . न्यूज व्याल्यू नसलेल्या बातम्यांना पान १ वर प्रसिद्धी देण्यात येत असल्याने वाचकातून या पेपरचे हसे होत आहे . याकडे ठाकुरजी वेळीच लक्ष देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे . अन्यथा अशा चुकीच्या बातम्या सारख्या लागत गेल्यास या पेपरचा खप उतरणार यात तिळमात्र शंका नाही