डोंगरधारी उर्फ रंगीला औरंगाबादीने केली पद्मश्रीची अडचण

डोंगरधारी उर्फ रंगीला औरंगाबादी हा पद्मश्रीच्या पेपर मध्ये माणसेच टिकू देत नाही हे सर्वश्रुत आहेच. त्याच्या जाचाला कंटाळून मुंबई - ठाण्याची पूर्ण टीम 'मी मराठीच्'या वाटेला गेली. आता मुंबईत चार-पाच रिपोर्टर आहेत तर ठाण्यात एकच माणूस सर्व बीटचा भार एकहाती पेलतोय. अशा स्थतीत पद्मश्री यांनी पेपरला 'संजीव'नी मिळवण्यासाठी  डोंगरधारीच्या डोक्यावर एक नवा संपादक आणला. आता डोक्यावर एक नवा माणूस आला म्हणाल्यावर हा डोंगरधारी आपणहून पेपर सोडून जाईल असे पद्मश्री यांना वाटले होते पण कसले काय… डोंगरधारीला बाहेर काडीचीही किंमत नाही, कोणी नोकरी द्यायला तयार नाही अशा स्थित हा डोंगरधारी कसला जातोय पेपर सोडून. आता दोन महिने होत आले पण डोंगरधारी काय सानपाडा भवन सोडायला तयार नाही. त्यामुळे आता पेपर व्यवस्थापनाला एकाच ठिकाणी  दोन संपादकांना दीड लाखाच्यावर पगार द्यावा लागतोय. त्यामुळे पद्मश्रीची तर चांगलीच अडचण झालीय आणि दोन संपादक ठेवून देखील उपयोग काय? जर खाली बातम्या आणणारे रिपोर्टरच नाही. दोन संपादकांना दीड दीड लाख पगार देण्यापेक्षा जे पेपरसाठी दिवस रात्र एक करून राबराब राबताहेत, मोठ्या मोठ्या पगाराची ऑफर येवून देखील जे आजही पेपरशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत त्यांना पगारवाढ द्या. राबराब राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली तर ते तन मनाने काम करतील आणि नक्कीच पेपरचा मान उंचावेल. पण आता हे मालकमंडळीना सांगणार कोण ?