पत्रकार संदीप कोठारी यांच्या हत्त्येचा निषेध

उत्तर प्रदेशात एका मंत्र्याच्या सांगण्यावरून गजेंद्रसिंह नावाच्या एका पत्रकारास पोलिसांनी जाळून ठार मारले,एका पत्रकारावर गोळ्या झाडण्यात आल्या,अन्य एका पत्रकाराला गाडी खाली चिरडण्याचा प्रयत्न केला गेला,उत्तर प्रदेशमधून आलेल्या या बातम्याच्या धक्क्यातून माध्यम जगत सावरलेलं नसतानाच आज मध्य प्रदेशच्या बालाघाटमधून संदीप कोठारी नावाच्या पत्रकाराचे अपहरण करून त्यांना महाराष्ट्राच्या हद्दीत आणून अत्यंत अमानूषपणे जिवंत जाळण्यात आले.त्यानंतर त्यांचे तेथेच दफन करण्यात आले.अंगाचा थरकाप उडविणारी आणि माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना चिंता वाटावी एवढ्या प्रमाणात वाढल्या आहेत,मात्र कोणतेही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार पत्रकारांच्या सुरक्षतेच्यादृष्टीने कोणतेच उपाय योजीत नसल्यानं अशा घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते आहे.महाराष्ट्रात अलिकडेच नाशिक आणि जळगावमध्ये पत्रकारांवर हल्ले झाले.गेल्या सहा महिन्यात41 पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत.राज्यात सरासरी चार दिवसाला एक पत्रकार हल्लयांचा शिकार होत आहे.हे आता असय्य होत चालले आहे.संदीप कोठारी यांची हत्तया आणि महाराष्ट्रात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करीत आहोत.संदीप कोठारी यांच्या मारेकर्‍यास अटक झालेली असली तरी उत्तर प्रधेशमधील मंत्री राममूर्ती याला अद्याप अटक झालेली नाही.राममूर्ती वर्माला तातडीने अटक करावी आणि गजेंद्रसिह आणि संदीप कोठारीच्या हत्तयेची सीबीआय मार्फत चौकशी करावी आणि देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू करावा अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करीत आहे.