नव जागृती : 10 जुलैची डेडलाईन...

पुणे - पुण्यात 1 जानेवारी रोजी सुरू झालेल्या नव जागृती चॅनलचा तिढा अजूनही सुटलेला नाही.मालकाने एप्रिल,मेचा पगार न केल्यामुळे सर्व कर्मचारी 29 जूनपासून संपावर गेले आहेत.10 दिवस झाले तरी मालकाने अजूनही पगार केलेला नाही आणि नविन बुलेटीन सुरू झालेले नाही.
याबाबत विचारविनमय करण्यासाठी आज 7 जुलै रोजी कर्मचाऱ्यांनी चॅनलच्या ऑफीसमध्ये बैठक घेतली.सर्वांची इच्छा चॅनल पुन्हा सुरू व्हावे असली तरी किमान एप्रिलआणि मे पगार झाल्याशिवास काम सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला.संचालक सलिम यांनी एप्रिल आणि मे महिन्याचा पगार 10 तारखेपासून वाटप करण्याचे आश्वासन दिले.15 जुलैपर्यंत पगार न झाल्यास चॅनलला कायमस्वरूपी कुलूप पडणार,अशी चिन्हे दिसत आहेत.
त्याचबरोबर एप्रिल,मे आणि जूनचे मानधन न मिळाल्यास कामगार न्यायालयात दाद मागण्याचा इशारा राज्यातील स्ट्रींजर रिपोर्टरनी दिला आहे.कर्मचाऱ्यांनीही हाच निर्णय घेतला आहे.