खरंच,एबीपी माझाचा उलटा प्रवास सुरू...


जेव्हा प्रसन्न जोशी यांनी एबीपी माझाला सोडचिठ्ठी दिली होती,तेव्हा बेरक्याने लिहिले होते,एबीपी माझाचा उलटा प्रवास सुरू...
अगदी तसंच घडतंय...
निलेश खरे,प्रसन्न जोशी,नंतर आता अमित भंडारीनं राजीनामा दिलाय.लवकरच आणखी एक भारदस्त आवाज जय महाराष्ट्रच्या गोटात गेल्यास एबीपी माझाची खिचडी झालीच म्हणून समजा.
ज्या गतीनं एबीपी माझा टॉपवर गेलं,त्याच गतीनं आता खाली येताना दिसतय.म्हणतात ना,यशही पचवता आलं पाहिजं.एबीपी माझाला यश पचवणं आता अवघड होत चाललंय.
प्रसन्न जोशीनी एबीपी माझाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रात्री ९ च्या माझा विशेषची जबाबदारी नम्रता वागळे यांना देण्यात आली.पण तिच्याबद्दल दर्शकांनी टिकेचा सुर आवळ्यानंतर पुण्यात अनेक वर्षे रिपोटींग करणा-या मयुरेशला संधी देण्यात आली,पण घडलं उलटच.नम्रताबाईपेक्षा मयुरेशवर जास्त टीका सुरू झाली.आता माझा विशेषची जबाबदारी कोणाकडं द्यावी,असा संभ्रम संपादक राजीव खांडेकर यांना पडला आहे.खांडेकरांची अवस्था आयाळ नसलेल्या सिंहासारखी झाली आहे.एकमेव राहूल खिचडीमुळे सध्या चॅनल तग धरून आहे.खिचडी गेले की,एबीपी माझाची खिचडी झालीच म्हणून समजा.त्यामुळंच खिचडींच्या संपर्कात जय महाराष्ट्र आहे,आणि खिचडी एबीपी माझाला जय महाराष्ट्र करतील,असं कोणाला वाटत नाही.
यदा कदाचित खिचडी गेले की,लिहून घ्या,आठ वर्षापुर्वी एबीपी माझा जसा होता,तसाच पुन्हा होईल,हे सुर्य प्रकाशाऐवढे स्पष्ट आहे.
एबीपी माझामध्ये सध्या एक चर्चा आहे,१५ ऑगस्टनंतर चॅनलमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत.गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी काम करणा-यांचे टेबल बदलण्यात येणार आहेत.असे करून चॅनल पुर्वपदावर येणार का,याकडं सध्या लक्ष वेधलय.
सध्या तरी एबीपी माझामध्ये भूकंपाचे धक्के सुरू आहेत,हे मात्र खरं आहे.