विचार मरत नसतात...

बेरक्या सुरू होवून साडेचार वर्षे झाली.बेरक्याची लोकप्रियता आता किती आहे,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
बेरक्या हे मीडियाच्या बातम्या देण्याचे माध्यम आहे.अन्य क्षेत्रातील बातम्या देण्यासाठी नविन व्यासपीठ सुरू करा,अशी सूचना आमचे मित्र करत होते.त्यानुसार आम्ही आज गुरूवार दि.१३ ऑगस्ट २०१५ पासून पोलखोल (सत्याला साथ,अन्यायाला लाथ)सुरू करत आहोत.
शासन,प्रशासन,राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे.त्यांचा पोल खोलण्यासाठी पोलखोल हे व्यासपीठ सुरू होत आहे.
आता सामान्य नागरिक सुध्दा आपल्या व्यथा या व्यासपीठावरून मांडू शकतात.फक्त एकच अट आहे,बातमी सत्य हवी.
आपणाकडे स्मार्ट फोन असेल तर मग हे करा..
कुठे अन्याय,अत्याचार होत असेल किंवा कोणी पैसे मागत असेल तर फोटो काढा,ऑडिओ क्लीप बनवा किंवा व्हीडीओ शुटींग करा आणि ते आम्हाला ईमेलने पाठवा...सोबत सविस्तर माहिती लिहा.
त्याचबरोबर कोणत्या प्रामाणिक अधिका-यांवर किंवा कर्मचा-यांवर अन्याय होत असेल तर तेही आम्हाला कळवू शकतात.त्यांची बाजू आम्ही घेवू.
कोणत्याही प्रामाणिक कर्मचारी आणि अधिका-यांवर आमच्याकडून अन्याय होणार नाही.आम्ही त्यांची बाजू घेवू..
म्हणूनच आमचे ब्रिद आहे...
सत्याला साथ आणि अन्यायाला लाथ.
पोलखोल सुरू करण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे,बेरक्या ब्लॉग आणि बेरक्या फेसबुक आय.डी.हॅक करण्याचे अनेकवेळा प्रयत्न झालेले आहेत.परंतु आम्ही त्यास पुरून उरलो आहोत.
यदा कदाचित दुर्देवाने असे झाले तर पोलखोल आहेच...
नंतर पुन्हा नव्याने बेरक्या उभा करू...
तेव्हा आमच्या विरोधकांनी लक्षात घ्यावे...
विचार मरत नसतात...
आम्ही एक काय दहा बेरक्या सुरू करू...
तेव्हा वाचत रहा...
बेरक्याबरोबर पोलखोल...
http://www.polkhol.co.in