'मी मराठी'वाल्यांनी लॉन्च केला 'ट्वीटर'चा 'टॅब'!!


तांत्रिक संकल्पना न समजल्याने पत्रकाराने केली मजेशीर चूक...
अनेकदा पत्रकार मंडळी घाई-गडबडीत अफलातून घोळ करतात व मोठा विनोद उभा राहतो. परवाच ट्विटरने ‘मोमेंटस्’ हे नवीन फिचर लॉन्च केले. ‘मी मराठी’ने काल सकाळी अकरा वाजता ही बातमी फार मनोरंजक पद्धतीने दिली आहे.
खरं तर ‘मोमेंटस्’ हे फ़क्त एक नवे फिचर आहे. मात्र, 'मी मराठी'च्या भाषांतरकार, पत्रकाराने तो चक्क ‘टॅब’ असल्याचे नमूद केलेय. गंमत अशी की, ट्विटरने वेब व्हर्शनसाठी मुख्य मेन्यूमध्ये ‘टॅब’ दिली असून मोबाईल व्हर्शनसाठी मात्र ही टॅब खालील बाजूस दिली आहे. येथे ‘टॅब’चा अर्थ त्या भागातील एक विशिष्ट आकाराचा क्लिक करण्याजोगा भाग असा आहे. उदाहरणार्थ फेसबुकच्या आपल्या प्रोफाईलवर टाईमलाईन, अबाऊट, फ्रेंडस, फोटोज आदी बाबी स्वतंत्र ‘टॅब’च्या स्वरूपात दर्शविण्यात आल्या असतात. मात्र संबंधीत व्यक्तीने हा ‘टॅब’ म्हणजे ‘टॅबलेट’ असल्याचा समज करून बातमी दिलीय. आता बोला....
बरयाचवेळा आततायीपणा, अपूर्ण ज्ञानाअभावी असे घडते. एखादी संकल्पना (विशेषत: तंत्रज्ञानातील) पूर्णपणे न समजल्यामुळे अगदी मेनस्ट्रीम मीडियातही कसा घोळ होतो? याचे हे उदाहरण आहे. हा प्रकार अगदी मोठ्या मीडिया हाऊसेसमध्येही होत असतो. परिणामी तंत्रज्ञानावर वार्तांकन करतांना मूळ विषय समजून घेणे आवश्यक आहे.
खालील लिंकवर वाचा 'मी मराठी'ची पूर्ण बातमी....
ट्विटरचा ‘मोमेंट्स’ टॅब लॉंच
Thu, 08/10/2015 - 11:04
मी मराठी डिजीटल
न्यूयॉर्क – मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने ‘मोमेंट्स’ नावाचा टॅब लॉंच केला असून या टॅबच्या मदतीने यूजर ट्विटरवर असलेली सर्वात महत्वाची स्टोरी अथवा इतर माहिती लगेच बघू शकणार आहे.
http://mimarathi.in/Twitter-to-Release-new-Feature-Moments