सुमारराव आणि 'मठ्ठा'ले यांच्या कार्यक्रमाचा फज्जा

मराठी पत्रकार परिषदेच्या ठाण्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यास अपशकून करून परिषदेचा कार्यक्रम उधळून टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांचाच पुरस्कार वितरण सोहळ्याचा फज्जा उडाल्याने 'करावे तसे भरावे' या वाकंप्रचाराचा प्रत्यय आला.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने गिरीश कुबेर,संजय आवटे या प्रस्थापित संपादकांना पुरस्कार जाहीर करून या पुरस्कारांचं वितरण सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते करण्याचं ठरलं होतं.त्या नुसार काल पत्रकार दिनी हा पुरस्कार वितऱण सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडला.मात्र ज्यांना मुंबई संघानं पुरस्कार जाहीर केला त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल संघातीलच काही सदस्य चर्चा करू लागले . ही चर्चा कुबेर यांच्या कानावर गेली.त्यामुळे संतापलेल्या कुबेर यांनी मग या पुरस्कार वितरण सोहळ्याकडेच पाठ फिरवत पुरस्कार वितरण सोहळ्यावरच एक प्रकारे बहिष्कार टाकला.एवढेच नव्हे तर या सोहळ्यास 25-30 लोकही उपस्थित नसल्यानं कार्यक्रमाचा पुरता फज्जा उडाला.नागपूरहून खास कार्यक्रमासाठी आलेल्या व्दादशीवारांची अवस्था मग 'कुठुन कार्यक्रमास आलो' अशी झाली.पत्रकार दिनाचा हा कार्यक्रम सुतकी वातावरणातच पार पडला. एसेम देशमुख यांच्या कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करणारे सुमारराव आणि 'मठ्ठा'ले हे दोघेही आपल्या होम पिचवरच तोंडावर आपटल्याची चर्चा मुंबईतील पत्रकारांमध्ये सुरू आहे.ठाण्यातला कार्यक्रम मात्र ऐतिहासिक झाल्याची माहिती बेरक्याला मिळाली आहे.
(ठाण्यातला परिषदेचा कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी कसे खटाटोप केले गेले आणि एसेम या सार्‍या टोळ भैरवांना कसे पुरून उरले याचा वृत्तांत थोड्याच वेळात आम्ही देत आहोत.)