भामटा राज गायकवाड सुटला,राज्याचे पोलीस झोपेत

सांगली - महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक गोरगरीब लोकांना खोट्या भूलथापा देवून,आर्थिक फसवणूक करणारा सांगलीचा भामटा राज गायकवाड अखेर बीदर जेलमधून पाच महिन्यानंतर जामिनावर सुटला आहे.जामिनावर सुटल्यानंतर महाराष्ट्रातील पोलीस त्यास ताब्यात घेतील,असे लोकांना वाटत असताना राज्यातील पोलीस मात्र झोपा काढत आहेत.या भामट्याला तात्काळ अटक करून गोरगरीब जनतेचा पैसा परत करून द्यावा,अशी मागणी होत आहे.शेळी पालन उद्योग कागदोपत्री दाखवून राज गायकवाड नावाच्या भामट्याने पाच हजार रूपयापासून दहा लाख रूपयापर्यंत लोकांकडून रक्कमा वसूल केल्या.एक वर्षात दामदुप्पट पैसे देण्याचे आश्वासन दिले,मात्र मुदत संपताच हा भामटा टाळाटाळ करू लागला.त्याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.पण पाच महिन्यापुर्वी बीदर पोलीसांनी या भामट्याला अटक करून तुरूंगात डांबले.पाच महिन्यानंतर तो जामिनावर सुटला आहे,परंतु राज्यातील पोलीसांनी त्यास तात्काळ अटक करणे अपेक्षित असताना,पोलीस झोपा काढत आहेत.राज्याचे गृह विभाग सुध्दा झोपलेले दिसत आहे.
याच भामट्याने नव जागृती चॅनल काढून कर्मचा-यांची फसवणूक केली.सहा महिन्यात चॅनल बंद करून,तीन महिन्याचा पगार बुडवला.त्याच्यावर पुण्यात येरवाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल आहे.पोलीस या प्रकरणी बघ्याची भूमिका घेत आहेत.