‘पुढारी’ची औरंगाबाद आवृत्ती मे-जूनमध्ये!

- पद्मश्रींकडून वेगवान हालचाली सुरु
- पुणे प्रिटींग युनीटमधील एक मशीन औरंगाबादला हलविणार
- संपादकपदासाठी ज्येष्ठ संपादकाशी बोलणी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर :
अखेर दैनिक पुढारी औरंगाबादेत येत आहे. दिव्य मराठीचा वाजलेला बोर्‍या, लोकमतचा घसरलेला खप आणि इतर वृत्तपत्रांची फारशी नसलेली स्पर्धा पाहाता, पद्मश्रींनी तातडीने औरंगाबाद आवृत्ती सुरु करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार 1 मेपासून अंक देण्याचे नियोजन असून, तांत्रिक कारणाने उशीर झालाच तर 1 जूनपासून तरी अंक देण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यासाठी पुणे (कात्रज प्रेस) येथील एक प्रिंटींग मशीन औरंगाबादला हलविण्यात येणार असून, त्यासाठी घाई केली जात आहे.
दुसरीकडे, औरंगाबाद आवृत्तीसाठी एक वरिष्ठ संपादक पद्मश्रींच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. दैनिक सकाळला वरिष्ठ बातमीदार राहिलेले अभय निकाळजे पुढारीत ज्वाईन झाले खरे; परंतु त्यांच्या परफॉर्मन्सविषयी अत्यंत निगेटीव्ह रिमार्क पद्मश्रींना मिळालेले आहेत. त्यामुळे संपादकीय टीम निवडताना घाई न करण्याचा निर्णय पद्मश्रींनी घेतला आहे. ‘पुढारी’ औरंगाबाद येत असल्यामुळे ‘देशोन्नती’ने औरंगाबादेतून प्रिंटींगचा आपला निर्णय बदलला असून, विदर्भावरच लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, पद्मश्रीनेदेखील नागपुरात तूर्त तरी न जाण्याचे ठरवून आपले ‘सोयरे’पण जोपासले आहे.