कुबेरांनी अखेर 'गुडघे' टेकवले !

'लोकसत्ता'च्या इतिहासात प्रथमच एक आक्रीत घडले आहे.बातम्याबद्दल नेहमीच 'दिलगिरी' व्यक्त करून माफी मागणा-या 'लोकसत्ता'ला चक्क अग्रलेखाबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागावी लागली आहे.यावरून संपादक गिरीश कुबेर यांची 'बौघ्दीक दिवाळखोरी' जाहीर झालेली आहे.
नेहमीच 'वादग्रस्त' अग्रलेख लिहून चर्चेत राहणा-या गिरीश कुबेरांनी दि.१७ मार्च रोजी 'असंतांचे संत' असा अग्रलेख लिहून ज्येष्ठ समाजसेविका 'मदर तेरेसा' यांच्या कार्यावर गरळ ओकले होते.हा अग्रलेख प्रसिध्द झाल्यानंतर ख्रिस्ती धर्मात प्रचंड असंतोष पसरला होता.त्यामुळे व्यवस्थापकांनी कुबेरांवर दबाव आणून माफी मागण्यास सांगितले.त्यानंतर दि.१८ मार्च रोजी पहिल्या पानावर या अग्रलेखाबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागण्यात आली आणि हा अग्रलेख मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.लोकसत्ता ऑनलाईनवरून हा अग्रेलेख डिलीट करण्यात आला आहे.मात्र जो अंक प्रिंट झाला,त्याचे काय ?
'लोकसत्ता'च्या इतिहासात अग्रलेख मागे घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.गिरीश कुबेरांचा अकलेचा कांदा झाला असून,त्यांची बौध्दीक दिवाळखोरी निघालेली आहे.
मागे दुष्काळग्रस्त शेतक-यांबाबत 'बळीराजाची बोगस बोंब' लिहिणा-या कुबेरांनी महाराष्ट्रात प्रचंड टीका होवूनही माफी मागितली नव्हती.यावेळी मात्र त्यांनी गुडघे टेकवले.त्यांच्या दुप्पटी भूमिकेबद्दल वाचकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

नेहमीच वादग्रस्त अग्रलेख लिहून चर्चेत राहणाऱ्या गिरीश कुबेरांनी माफी मागून अग्रलेख परत घेण्याऐवजी राजीनामा मालकाच्या तोंडावर फेकला असता तर आम्ही त्यांचे स्वागतच केले असते आणि उलट त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो असतो.परंतु केवळ नोकरीसाठी जो लाचारीपणा पत्कारला आहे,त्याचे आम्हालाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना हसू येत आहे.कुबेरांना आता पत्रकारांना उपदेशाचे डोस पाजण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही.
महाराष्ट्रातील आदर्श संपादकाची फळी केव्हाच संपलेली आहे,आता कुबेरासारखे व्यावसायिक संपादक तयार झालेले आहेत.कुमार केतकर नंतर एक अभ्यासू संपादक म्हणून गिरीश कुबेर यांच्याकडे पाहिले जात होते,परंतु केतकरांनी मी मराठीत जावून स्वत:चे जसे हासू करून घेतले तसेच अता कुबेरांनी अग्रलेख मागे घेवून स्वत:चे हसू करून घेतले आहे.
अग्रलेख परत घेण्याची लोकसत्ताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.इतकेच काय तर मराठी वृत्तपत्र सृष्टीत असे कधी घडले नव्हते.कुबेरांनी ज्या पध्दतीने गुडघे टेकवले  आहेत,त्याचे कोणीच समर्थन करणार नाही.उलट त्यांनी सरळ राजीनामा देवून बाहेर पडायला हवे होते.
बळीराजाची बोगस बोंब असा अग्रलेख लिहिण्यानंतर विधीमंडळासह महाराष्ट्रात गदारोळ झाला असताना,कुबेरांनी अग्रलेख मागे घेतला नव्हता,मात्र मदर तेरेसा यांच्या लिखाणाबाबत मात्र त्यांनी गुडघे टेकवले.आता त्यांनी आपण केवळ व्यावसायिक संपादक आहोत,मालक सांगेल तसे वागतो असे एकदाचे जाहीर करावे,म्हणजे आम्ही त्यांना कधीच काही म्हणणार नाही.