'बेरक्या' ब्लॉगला पाच वर्ष पूर्ण

'बेरक्या' ब्लॉग सुरु होवून बघता - बघता पाच वर्ष पूर्ण झाली, सहाव्या वर्षात पदार्पण करताना आम्हाला आनंद तर होत आहेच पण  मराठी मीडियात एक नवीन प्रयोग करुन तो यशस्वी करुन दाखवला याचा सार्थ अभिमान वाटत आहे.
21 मार्च 2011 रोजी 'बेरक्या'ची सहज निर्मिती केली,पत्रकारांच्या बातम्या देणारा पत्रकार म्हणून बेरक्या उदयाला आला. बेरक्या हे नाव सुरुवातीस लोकांना पचनी पड़त नव्हते, बेरक्या म्हणजे काय ? असे लोकांना वाटत होते, परंतु नंतर बेरक्याचे काम लोकांना हळू हळू माहीत झाले,
'बेरक्या' ब्लॉगने गेल्या पाच वर्षात 15 लाख पेक्षा अधिक हिट्सचा टप्पा गाठलेला आहे, महाराष्ट्र, देश आणि विदेशातील मराठी वाचक बेरक्या वाचत असतात,महाराष्ट्रातील तमाम पत्रकार, पत्रकारिता शिकत असलेले विद्यार्थी, वृत्तपत्रात काम करणारे सर्व कर्मचारी, शासकीय अधिकारी - कर्मचारी,पोलीस इतकेच काय तर राजकीय पुढारी, मंत्री आणि आम जनता बेरक्या वाचत असतात,
मराठी मीडियात नेमके काय घडत आहे, नवीन काय येत आहे, याची माहिती बेरक्याच्या माध्यमातून कळते, त्यामुळे बेरक्या मराठी मीडियाचा पी.टी.आय. तसेच गॅझेट झाला आहे, बेरक्यावर प्रकाशित झालेली बातमी 100 टक्के सत्य असते, हा विश्वास पत्रकारामध्ये निर्माण झालेला आहे.
'बेरक्या' कोणाचा मित्र किंवा शत्रू  नाही,जे घडते आहे , जे घडत आहे किंवा घडणार आहे, तेच  बेरक्या देतो,'बेरक्या' गेल्या पाच वर्षात कोणापुढे झुकलेला नाही किंवा झुकणार नाही,कोणतेही बातमी दबली नाही किंवा दबली जाणार नाही, जे असेल ते सड़ेतोड़ मांडणे हे आमचे काम आहे,
आम्ही चांगल्या पत्रकाराच्या पाठीमागे आजपर्यन्त खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत,आणि यपुढेही राहू, मात्र वाईट आणि पत्रकारितेला काळीमा फासणाऱ्याच्या विरुद्ध नेहमी आहोत आणि राहूत, त्यांची अजिबात गय केली जाणार नाही.गेल्या पाच वर्षात अनेक अडचणी येवून देखील बेरक्या सुरु राहिला, तो बंद पाडण्याचा खटाटोप अनेकांनी केला, परंतु आम्ही पुरुन उरलो आहोत.
बेरक्या असाच अखंड सुरु राहणार आहे.मग त्यासाठी कोणतेही किंमत मोजावी लागली तरी ती द्यायला आम्ही तयार आहोत.
पत्रकारांच्या कल्याणासाठी बेरक्या आहे, त्यांच्या कल्याणासाठी जेलमध्ये जावे लागले तरी त्याची पर्वा नाही. आमचा वकील आणि सातबारा तयार आहे. आणि आमच्या पाठीमागे असंख्य पत्रकार खंबीरपणे उभे आहेत.
असो,
आपले प्रेम, स्नेह आणि सहकार्य असेच कायम राहो, ही सदिच्छा !
आपला,
बेरक्या उर्फ नारद