मंगेशाने सुत्रे घेतली,आता चौकशीचे भुंगे सुरू

लातूर - पुरोगामी विचारसरणीच्या दैनिकातून पांडू हवालदारची हकालपट्टी झाल्यानंतर याच दैनिकातून पुढारीमध्ये दोनदा फेरी मारणा-या मंगेशाची तिस-यांदा नियुक्ती करण्यात आली असून,या मंगेशाने आपल्या पदाची सुत्रे शनिवारी घेतली आहेत.आता हा मंगेशा शनी होवून एका-एकाच्या मागे लागणार असल्यामुळे पांडू हवालदारच्या पंटरनी धास्ती घेवून अंथरून धरले आहे.
१९९१ मध्ये साहेबांनी पुरोगामी विचारसरणीच्या दैनिकांची मुहूर्तमेढ रोवली.तुकाराम कोकजे,गुरूनाथ नाईक,मधुकर भावे,राजा माने आणि शेवटी -शेवटी शरद कारखानीस या नामांकित पत्रकारांनी संपादकपद भूषवलेल्या या दैनिकाच्या संपादकपदी पांडू हवालदारची नियुक्ती झाली आणि या दैनिकाची रयाच गेली.या बहाद्दराने कधी बातमी नीट लिहिली नाही तर अग्रलेख कसा लिहिणार ? सर्व अग्रलेख जोशी आणि गवळीच लिहित होते.नाव मात्र पांडु हवालदारचे.संपादक होताच पांडू हवालदारचा इतका रूबाब आणि मग्रुरी वाढली की,साहेबांची गाडी ऑफीसला आली की, गाडीचे डोअर उघडायला शिपाई,बॅग उचलायला शिपाई, कॅबिनच्या बाहेर शिपाई थांबलाच पाहिजे,नंतर गाडीत बॅग ठेवायला शिपाई,जिमहून येईपर्यत बॅग धरायला शिपाई,इतकी पिळवणूक सुरू होती.शिपायाने एक मिनीटात पाणी नाही आणले की शिव्या,गाडी जवळ आल्यानंतर शिपाई नाही आला शिव्या,अशी मग्रुरी सुरू होती.डीटीपी ऑपरेटर महिलांचाही छळ या पांडू हवालदाराने मांडला होता.पांडू हवालदारची हकालपट्टी होताच आणि त्याची बातमी बेरक्यावर येताच पंटर सोडून सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पांडू हवालदारची ऑफीसने गाडी काढली असून,ही गाडी आता नव्या संपादकांना देण्यात आली आहे.पांडू हवालदार आता नविन गाडी घेण्याची शक्यता आहे.परंतु आता रूबाब मात्र पहिल्यासारखा राहणार नाही.गाडीच्या खालून कुत्रे चालते,कुत्र्याला वाटते आपणच गाडी चालवतो,तसे या पांडू हवालदारचे झाले होते.आता मुळ अवकातीवर हा पांडू हवालदार आला आहे.या दैनिकात काही जण संस्थानिक झाले आहेत.जेव्हा जॉईन झाले तेव्हा भाड्याच्या घरात होते,आता यांच्याकडे गाड्या,बंगले,प्लॉटिंग,शेती आली.या संस्थानिकाच्या मागे आता ससेमिरा लागलेला आहे.
असो,मंगेशाने तिस-यांदा सूत्रे हाती घेताना,छोट्या देशमुखांना काही अटी सांगितल्या होत्या.त्या अटी मान्य झाल्या असून,चौकशीचे भुंगे येत्या काही दिवसांत सुरू होणार आहेत.त्यामुळे पांडू हवालदाराच्या पंटरमध्ये खळबळ उडाली आहे.