सुंदर लटपटे पुढारीच्या कार्यकारी संपादकपदी रूजू...

औरंगाबाद : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लिखाणासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे पुढारीच्या कार्यकारी संपादकपदी रूजू झाले असून, त्यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांनी पुण्यनगरीला राजीनामा दिला. पुढारी सुरू होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, सध्या डमी अंक काढणे सुरू आहे. बहुधा दिवाळीपूर्वी पुढारी लाँqचग होईल, अशी शक्यता आहे.
 निवासी संपादक भालचंद्र पिंपळवाडकर यांनी सोडल्यानंतर पुढारीला कुणी वालीच उरला नव्हता. सुशील कुलकर्णी यांनी पुढारीच्या कार्यकारी संपादकपदाची सूत्रे हाती घेतली, ती काही तासांचीच. अवघ्या काही तासांनी ते जे सुटीवर गेले ते थेट, एकमतमध्येच ते रूजू झाल्याची माहिती पुढारीवाल्यांना कळली. त्यानंतर अनेक संपादकांशी पुढारीने संपर्क केला. पिंपळवाडकर यांना परत आणण्याचेही प्रयत्न केले. पण यश आले नाही. अखेर काहीच दिवसांपूर्वी सुंदर लटपटे यांना पुढारी करण्यात त्यांना यश आले. त्यांच्यासारखा तगडा संपादक मिळाल्याने अर्थात औरंगाबादच्या वृत्तपत्रांत स्पर्धा वाढणार आहे.
लोकमत, सकाळ, दिव्य मराठी, पुण्यनगरी, गावकरी, महाराष्ट्र ट्राइम्स आणि आता पुढारी पुढारपण मिरवणार आहे. भरीसभर एकमतही सुरू होण्याच्या हालचाली सुरू आहेत. इकडची माणसं तिकडची माणसं इकडे जात कर्मचाऱ्यानाही सुगीचे दिवस आले आहेत. सुरू होण्याआधी पुढारीची गळती सुरूच पुढारीतून भालचंद्र पिंपळवाडकर यांनी राजीनामा दिल्यानंतर एकूण तिघांनी पुढारी सोडला. त्यातील एक जण पुण्यनगरीत, तर दोघे पुन्हा सकाळमध्ये स्वगृही परतले.