पुढारीने जुन्या भात्यातील बाण काढला....निवासी संपादकपदी मुकूंद फडके

औरंगाबाद - एकमतच्या मंगेश डोंग्रजकर यांनी नकार देताच,पुढारीने जुन्या भात्यातील बाण काढत सातार्‍याच्या मुकूंद फडके यांंची निवासी संपादकपदी निवड केली आहे.फडके हे सध्या पुण्यात प्रभातचे निवासी संपादक म्हणून काम करत असून,येत्या 15 नोव्हेेंबर रोजी ते औरंगाबादेत आपला पदभार स्वीकारतील.
मुकूंद  फडके हे यापुर्वी कोल्हापुरातील पुढारीत दोन वेळा काम केलेले आहे.पुढारीची ध्येय-धोरणे माहीत असणारा आणि पुढारीच्या पठडीत काम करणारा निवासी संपादक अखेर पुढारीला मिळाला आहे.रात्रपाळीमध्य पाने बदलण्यापासून कोणत्या बातम्या कोणत्या पानावर घ्याव्यात हे फडके यांना माहीत असल्याने पुढारीची डोकेदुःखी कमी होणार आहे.पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक काम करणार्‍या फडके यांच्या डोक्यावर अखेर पुढारीचा मुकूट ठेवण्यात आला आहे.

अखेर मुहूर्त निघाला....17 नोव्हेंबर रोजी पुढारीचे लॉचिंग
पुढारीचा लांबलेला पाळणा अखेर 17 नोव्हेंबर रोजी हालणार आहे.फडके हे येत्या 15 तारखेला जॉईन होणार आहेत तर पुढारीचे प्रकाशन 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे.त्याची तयारी पुढारीने केली आहे.पुढारीचे प्रकाशन कोणाच्या हस्ते होणार,याकडे लक्ष वेधले आहे.