नोटाबंदीचा फटका पुढारीलाही....

औरंगाबाद - नोटाबंदीचा फटका पुढारीलाही बसला आहे.त्यामुळे पुढारीचा पाळणा पुन्हा एकदा लांबला आहे.यामुळे पुढारीचे कर्मचारी.वार्ताहर अस्वस्थ झाले आहेत.पुढारी प्रकाशनापुर्वीच पुन्हा एकदा गाशा गुंडाळणार की काय,अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे,मात्र नोटाबंंदीची समस्या सुटल्यानंतर पुढारी सुरू करण्यात येईल.असे पुढारीच्या एका सुत्राने सांगितले.
नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने,अशी म्हण पुढारीला नेहमीच लागू पडते,ती पुन्हा एकदा लागू पडली आहे.पुढारीचा पहिल्यांदा 17 सप्टेंबर.नंतर दिवाळी मुहुर्त हुकल्यानंतर आता 17 नोव्हेंबरचा मुहूर्त काढण्यात आला होता,परंतु हा मुहुर्तही आता नोटांबदीच्या निर्णयामुळे हुकला आहे.
500 आणि 1000 रूपयाच्या नोटा रद्द करण्यात आल्यानंतर पुढारीला चलन तुटवड्याचा सामना करावा करावा लागत आहे.या चलन तुटवड्यामुळे पुढारीची अनेक कामे अडल्याची माहीती देण्यात आली.तथापी,पुढारीचा डमी अंक दररोज काढला जात आहे.मराठवाड्यातील बातम्या ऑनलाईन पुढारीवरही झळकत आहेत.एकीकडे चलन तुटवडा आणि दुसरीकडे प्रिटींग मशिनचा प्रॉब्लेम यामुळे पुढारीचा पाळणा पुन्हा एकदा लांबला आहे.तो कधी हालणार हे आता प्रत्यक्षात पद्मश्रीच सांगू शकतात...