चांगल्या समाजासाठी चॅनेलमध्ये कॉस्ट कटिंगची हवा..

मुंबई-स्वतःला चांगल्या समाजासाठी म्हणवणाऱ्या चॅनेलमध्ये सध्या कॉस्ट कटिंगची हवा सोडली जातेय. टीआरपीमध्ये प्रचंड घट झालीये. "इडली" आणि "ढोकळा" नीट काम करणाऱ्या लोकांच्या नाकी नऊ आणतायत. होय महाराजा म्हणणाऱ्या लोकांचे मात्र अच्छे दिन आलेत. मेहनत करणाऱ्या एका पुणेकर नवं पत्रकार कन्येच्या रोजच्या सर्व स्टोरी आयडिया "ढोकळ्या"कडून नाकारल्या जातात आणि त्या कन्येला रोज आउटपुटमध्ये असलेल्या "बेदम" माणसाकडे पाठवून मानसिक त्रास दिला जातो. आणि हल्ली म्हणे रात्री 9.30 वाजल्यानंतरच संपादकीय बाणा जागा होतो. दिवसभर धावपळ करणाऱ्या राज्यभरातील सर्व जिल्हा प्रतिनिधींना रात्री 9.30 नंतर संपादकीय बाणा दाखवून त्यांना मूर्खात काढलं जातं. "हुशार" आणि "कमळ" या टीव्ही 9 मधील सर्वात जुन्या जाणत्या रिपोर्टर्सना जेरीस आणण्याचे प्रयत्न केले जातात. " हुशार" आणि "कमळ" तिथल्या तिथे सूनवत असल्यामुळे त्यांच्या समोर कोणी पंगा घेत नाही" मात्र धड एक पाऊल पुढे नं टाकता आल्यामुळे तिथून गच्छंती झालेल्याला हाताशी धरून मागून त्यांना त्रास द्यायची संधी सोडत नाही. आउटपुट मधील "बेदम"त्रासाला कंटाळून अनेक जण राजीनामा देतायत. असाइंमेंटवरील "सोहनलाल" मिशीला कोकम लावून पिळ देत बसलेला असतो. एकुणचं काय तर चांगल्या समाजासाठीची वलग्ना करणाऱ्यांची अवस्था सध्या "दुसऱ्याचं पहायचं वाकून आणि स्वतःचं ठेवायचं झाकून" अशीच आहे....