गावकरीची नगर आवृत्ती बंद

नगर - गेल्या ४० वर्षांपासून सुरु असलेली गावकरीची नगर  आवृत्ती मालक वंदन पोतनीस यांनी कसलेही पूर्वसूचना न देता बंद केल्याने नगर जिल्ह्यातील अनेक पत्रकार बेकार झाले आहेत, त्याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबार आवृत्तीहि बंद करण्याचा निर्णय झाल्याने अनेकावर संक्रांत कोसळली आहे.
नोटबंदी, घटलेला जाहिरात व्यवसाय आणि थकबाकी यामुळे नगर आवृत्ती बंद  केल्याचे मालक वंदन पोतनीस यांचे म्हणणे आहे, परंतु नगर आवृत्तीचा वर्धापन दिन विशेषांक किमान १५० असायचा, जाहिरात व्यवसाय चांगला होता, वसुलीही चांगली होती, पण पोतनीस यांना घ्यायचे माहित आहे,द्यायचे माहित नाही, असा टोला पत्रकारानी मारला आहे. गेल्या ६ महिन्यापासूनच्या  थकीत पगारी  द्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे..