बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना !

पत्रकारांच्या सर्व व्हाट्स ग्रुप, फेसबुक आणि सोशल मीडियावर मराठी पत्रकार परिषद आणि एस एम देशमुख यांची चमकोगिरी याबद्दल ज्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत त्या आम्ही शेअर करीत आहोत.,,

1.
बस्स झाले ! आता दूर व्हा !

मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे, या परिषदेला मोठी परंपरा आहे, अनेक ख्यातनाम पत्रकार परिषदेचे अध्यक्ष झाले, 
पहिले कार्याध्यक्ष म्हणून  निवडून येवून नंतर अध्यक्ष होता येते, परंतु 75 वर्षाच्या इतिहासात ही परंपरा स्वतः ला ज्येष्ठ म्हणणारे एस.एम. देशमुख यांनी मोडून टाकली, त्यांची निवडच मुळात अनधिकृत होती ...

परिषदेचा कारभार पारदर्शक नाही, असला असता तर पुण्याच्या न्यास कार्यालयात ऑडिट रिपोर्ट दिला गेला असता....

परिषदेला जास्त उत्पन्न नाही, असे सांगणारे एस.एम. बँकेत तीन खाते कश्यासाठी उघडतात ?

शेगाव अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परिषदेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला, त्यामुळे अनेक मान्यवर पत्रकारांनी पाठ फिरवली, 
निखिल वागळे, श्रीमंत माने, गजानन जनभोर, रवी टाले सह अनेक पत्रकार जाण्याचे टाळले ..

शेगाव अधिवेशनास मुख्यमंत्री फडणवीस येणार म्हणून दोन महिने अगोदर घोषणा करण्यात आली होती, मुख्यमंत्री आले नाही, त्याचा खुलासा एस एम यांनी मुख्यमंत्री विदेशी गेलेत म्हणून आले नाहीत, असा केला पण मुख्यमंत्री 19 आणि 20 ऑगस्ट रोजी मुंबई मध्येच  होते...मुख्यमंत्री जाणीवपूर्वक आले नाहीत...

गिरे तो भी टांग याप्रमाणे शेगाव अधिवेशन प्रचंड यशस्वी झाले, असे एस एम यांनी लिहिले आहे, त्याला 2500 पत्रकार आले होते, असा शोध लावला आहे, 
मुळात या हॉलची क्षमता 750 आहे, सकाळी पालकमंत्री, सदाभाऊ यांच्यामुळे हॉल भरला होता, भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, नंतर मात्र हॉल रिकामा झाला, दुपारी निम्मे लोक दिसले,
250 ते 300 लोक असताना 2500 आले कुठून ?
बर यात लिहिणारे पत्रकार किती ? साप्ताहिक काढणाऱ्या लोकांचा भरणा अधिक...जे फक्त माहिती कार्यालयात अंक देतात ते आले होते... श्रमिक पत्रकार किती ? एस एम यांनी 2500 लोकांची यादी नाव, पत्ता आणि मोबाइल नंबरसह जाहीर करावी ...

पत्रकारांनी आगे बढो अश्या घोषणा दिल्या, सेल्फी काढली असे म्हणणे म्हणजे स्वतः च स्वतःची स्तुती करणे आहे, उलट लोकांनी खासगीत शेम शेम म्हंटले...

पत्रकार संरक्षण कायदा माझ्यामुळे झाला याचे श्रेय घेणाऱ्या एस एम यांनी , कायदा झाल्यानंतर किती पत्रकारांवर हल्ला झाला, हे जाहीर करावे, या कायद्या अंतर्गत किती आरोपीवर गुन्हा दाखल झाला, हे जाहीर करावे...हा कायदा वांझोटा  आहे...

शेगाव अधिवेशन सर्वात अयशस्वी ठरले आहे..या अधिवेशनाचे फलित काय ?
लोक गजानन महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते, सकाळी हजेरी लावून दुपारी गायब झाले...

आता पुढचे अधिवेशन शिर्डीला होणार म्हणून जाहीर करण्यात आले, 
त्यापुढील पंढरपूर, तुळजापूर, नाशिक करा, 
अरे हे पत्रकार अधिवेशन आहे की कुंभमेळा ?
किमान दर्शन निमित्त लोक यावेत, म्हणून हे सुरू आहे का ?


आता माझी 31 ऑगस्ट रोजी मुदत संपत आहे, मी समाधानी आहे, वगैरे वगैरे लिहिले आहे, मुळात एस एम यांची निवडच अनधिकृत आहे, यापूर्वीचे अध्यक्ष किरण नाईक यांचे शिक्षण बारावी पण नाही, त्यांच्याकडे कोणते पेपर नाही, एस एम कडेही कोणते पेपर नाही, या कार्यकारिणी मधील अनेका कडे पेपर नाही, फक्त संघटनेच्या नावाखाली झुंडशाही सुरू आहे...

एस एम आणि त्यांचे पँटर परिषदेचे संस्थानिक होऊ पहात आहेत...
रायगड मध्ये मराठी पत्रकार संघ मोजत नाही म्हणून रायगड प्रेस क्लब स्थापन केला, जिथे जे सोयीचे आहे ते केले...

अनेक पत्रकार संघांनी मराठी पत्रकार परिषदेशी संपर्क तोडून टाकला आहे..
औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील किती पत्रकार हजर होते ?
एकही पत्रकार गेला नाही ...

अनेक मान्यवर पत्रकारांनी परिषदेकडे पाठ फिरवली आहे, उस्मानाबाद, नांदेडसह अनेक ठिकाणी तुकडे पडले आहेत, याचे कारण एस एम आणि त्यांच्या पँटरचे सुरू असलेले गलिच्छ राजकारण...

एस एम मुळेच परिषद गाळात रुतत आहे, त्यांनी तात्काळ बाजूला व्हावे....
.........................
2.
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना !


शेगावला पत्रकारांचे अधिवेशन आयोजित करणारे संयोजक राजेंद्र काळे यांचा आता  फोन आला होता, त्यांचा हा पहिलाच फोन...

त्यांनी दिलेली माहिती अशी की, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ स्वतंत्र असून, आमची गेल्या दोन वर्षांपासून पत्रकार अधिवेशन घेण्याची इच्छा होती, म्हणून अधिवेधन घेतले, त्याला आम्ही एस एम देशमुख यांना निमंत्रित केले तसेच अनेक पत्रकारांनाही निमंत्रित केले होते, 

आम्हाला महाराष्ट्रात किती पत्रकार संघटना आहेत, हे माहीत नाही, आता हळू हळू कळत आहे...


मुळात हे आधिवेशन बुलढाणा  जिल्हा पत्रकार संघाचे होते, पूर्ण मेहनत या संघाचे पत्रकार घेत होते, मात्र या अधिवेशनात एस एम यांनी, जणू हे अधिवेशन स्वतः आयोजित केल्याचे सांगत स्वतःची टिमकी वाजवली आहे,

बुलढाणा जिल्हा पत्रकार स्वतंत्र आहे, त्याची न्यास मध्ये स्वतंत्र नोंदणी आहे. हे अधिवेशन मुळात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे होते, पण एस एम आणि त्यांच्या पंटरनि स्वतःची बॅनरबाजी करीत चमकोगिरी केली... खरे श्रेय बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे... एस एम यांचा काय संबंध ? तुम्हाला बोलावले म्हणून अधिवेशन तुमचे झाले का ? हे तर  बेगानी शादी  में अब्दुल्ला दीवाना ! झाले

एस एम याना बुलढाणा वाले निमंत्रीत केले नसते तर हे अधिवेशन प्रचंड यशस्वी झाले असते, आता त्यांना पश्चाताप होतोय...

बुलढाणा वाले तुमची काहीच चूक नाही, तुम्ही फक्त तुमचे काम केले,पण दुकानदारी चालवणाऱ्याना बोलावले म्हणून तुमच्या अधिवेशनाला ग्रहण लागले..

बुलढाणा वाल्याना आता जसा पश्चताप झालात तसा होवू देऊ नका..

आपल्या संघाची न्यास मध्ये स्वतंत्र नोंदणी करा, ऑडिट रिपोर्ट वेळीवेळी सादर करा, 
परिषदेवर संस्थानिक होऊ पाहणाऱ्याला धडा शिकवा...

एस एम हा पत्रकारामध्ये आपापसात भांडणे लावून स्वतःची पोळी शेकून घेतो, तेव्हा जागृत व्हा,यांची बडदास्त ठेवण्याची काही गरज नाही...


किरण नाईक याचे शिक्षण बारावी सुद्धा नाही, तो कोणत्या पेपरचे काम सुध्दा करीत नाही, तो विनाकारण लुडबुड करतो..
असे लुडबुडे दूर ठेवा ...


तुम्हाला शुभेच्छा पण सतर्क राहा, हीच अपेक्षा !