मीडियाची 'दुकानदारी' आणि पक्षातील 'पादरे पावटे'..

काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना आणि मीडिया हाऊसमधून सरकार विरोधात बातम्या रंगवणाऱ्या समस्त पत्रकारांना दुकानदारी असे संबोधून एक काम चांगले केले,आता प्रत्येकांनी आत्मपरीक्षण करावे आणि आपल्या दुकानात माल पुरवणारे फडणवीस यांच्या पक्षाचे पादरे पावटे कोण आहेत याचा विचार करावा.फडणवीस यांनी पक्षांतर्गत काहीच बंडाळी नाही त्यामुळे दिल्लीचे बोलावणे आल्याशिवाय मी आणि पक्षाध्यक्ष दानवे इथेच आहोत आणि आमची दोघांचीही पदे कायम आहेत असे सांगून टाकले.याचा अर्थ फडणवीस यांचे भवितव्य दिल्लीश्वरावर अवलंबून आहे.फडणवीस यांनी मीडियाला दुकानदारी बोलताना थोडेसे इतिहासात जायला हवे होते,आपण कोण होतो?इथपर्यंत आपल्याला कोण पोचवले ?नागपूर टू मुंबई या प्रवासातील आपल्याला मोठे केलेले दुकानदार कोण आहेत?छोट्या छोटया गोष्टीवर आपल्याला अमाप प्रसिद्धीच्या झोतात कोणकोणत्या दुकानदाराने आणले,आपण फायली घेऊन कुण्या दुकानदाराच्या पायऱ्या झिजवल्या,कोण कोण आपल्याला कच्चा माल पुरवत होते आणि कुणाच्या भरवश्यावर आपण काँग्रेस राष्ट्रवादीच्या अंगावर तुटून पडत होतो याचा विचार करायला पाहिले होता.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणत्या दुकानदाराला आपण माल भरण्यासाठी मदत केली आणि कोण आपले डमरू वाजवत सुटले त्यांना तरी यातून वगळायला हवे होते.जेव्हा एखादे बुमऱ्यांग अंगावर येत असते तेव्हा पत्रकार आणि मीडिया दुकानदार वाटायला लागतात.मेहता आणि देसाईंच्या भ्रष्टाचारामुळे हैराण झालेले फडणवीस यांनी मीडियाला दुकानदारी म्हणून हिनवण्याचे काम केले आहे,जे मीडिया हाऊस फडणवीस आणि त्यांच्या पक्षाचे बटीक आहेत त्यांनी शांत बसावे आणि खाजगीत जाऊन त्यांना प्रश्न विचारावा आम्ही तुमचे काय घोडे मारले,सब घोडे बारा टक्के असे म्हणून मीडियाला बोलण्याचा अधिकार कोण दिला?फडणवीस यांनी पक्षातील पादरे पावटे काढून बाहेर फेकावेत,जे पत्रकारांना बातम्या पुरवतात त्यांचा नायनाट करावा,आज पक्षात प्रचंड खदखद सुरु आहे,दानवे आणि त्यांचा गट बिथरलेला आहे,खडसे आणि त्यांचे समर्थक हैराण आहेत,तावडेंचे कार्यकर्ते एकाधिकारशाहीला कंटाळले आहेत,पंकजा मुंडे आणि त्यांचा वंजारा समाज आपण त्यांच्यावर अन्याय करताय म्हणून राग धरून आहे,मेहताना आपण वाचवण्याच्या प्रयत्नामुळे खडसे आणि मराठा समाजाच्या मनात प्रचंड असंतोष आहे,हेच सगळे बदलाचे वारे वाहत आहेत असे संकेत बाहेर पत्रकारांना देत आहेत,त्यात या अधिवेशनात विरोधकांनी आपल्याला पहिल्यांदाच शांत करून टाकले आहे,आपण किती जणांना झाकत फिरणार आहात,60%मंत्र्यांवर कसले ना कसले आरोप आहेत,आपण स्वतः क्लीन असून उपयोग काय?पक्षातील पादऱ्या पावट्यांनी कुठेतरी ओकल्याशिवाय बातम्या बाहेर फुटल्या काय?शेलार याना मध्येच डोहाळे कुठून लागले?संजय धोत्रेचे नाव पक्षाध्यक्ष पदासाठी कुठून आले?काही मंत्र्यांना हकालणार या काही बनी बनाया स्टोरीज नाहीत हे फडणवीस साहेब आपण लक्षात घेतले पाहिजे,आपण थोडेसे  पक्षातील ज्येष्ठाना विश्वासात घेऊन बसा,आपल्या नावावर कोण कुठे पट्ट्या फाडतय यांच्यावर लक्ष ठेवा,विरोधक अश्या बातम्या पेरत असावेत असे आपल्याला वाटत असेल तर ते डोक्यातून काढून टाका,ते आजही त्यांच्या चौकशीतच हैराण आहेत,मीडिया बोलली नसती तर आपले अधिवेशन शांततेत पार पडले असते,मेहता,देसाई वादात सापडलेच नसते,मीडियाला कमी लेखू नका,तुमच्या आयुष्याचे शिल्पकार मीडियावालेच आहेत,आणि तेव्हाही त्यांनी दुकानदारी केली असेल तर ते दुकानदार कोण होते ज्यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदापर्यंत आणण्याची सुपारी घेतली होती,त्याचाही खुलासा करावा.आपल्या कर्तुत्वाला मीडियाने मोठे केले आहे,आपण प्रामाणिक प्रयत्न करत होतात त्याला मीडियाने साथ दिलेली आहे,आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात उभारला होतात म्हणून तुम्हाला मीडियाने मदत केलेली होती.आम्ही आपली विधानसभेतील धडपड बघितली होती म्हणून मदत केली,जर मीडियाने आपली दखलच घेतली नसती तर आजही आपण नागपूर ते मुंबई अश्या चकरा मारत राहिला असतात,आजही हातात फायली घेऊन मंत्रालयाच्या परिसरात मीडियावाल्याना कॅन्टीनमध्यें बोलावून कोण किती भ्रष्टाचारी आहे हे सांगत राहिला असतात.मीडियाची दुकानदारी बोलण्यापूर्वी थोडासा विचार आपण करायला हवा होता,मीडियाने अनेक मुख्यमंत्री बनवले आहेत आणि अनेकांना पायउतार होतानाही पाहिलं आहे.आपण दुकानदारी शब्द परत घेऊन मीडियाची जाहीर माफी मागायला हवी,जे रोज देवेंद्रभाऊंना बातम्या पुरवतात त्यांनी काहीकाळ आपली दुकानदारी थांबवून समाचार घ्यायला हवा.कोणीही उठाव आणि मीडियाला दुकानदार म्हणावं हे बरोबर नाही आणि फडणवीस यांच्याकडून तरी हे अपेक्षित नाही,आज अनेक पुढारी मीडियाने बनवले आहेत त्यात आपणही एक आहेत हे विसरून चालणार नाही,त्यापेक्षा पक्षातील अंतर्गत बातम्या पुरवणाऱ्या सप्लायरला रोखण्याचे काम करा,पादरे पावटे बाहेर फेकले सगळे सुरळीत होईल.एका बातमीमुळे विलासराव देशमुख घरी आले,शरद पवार शांत बसले त्यामुळे मीडिया ट्रायलमध्ये अडकून पडू नका,कोणतीही मीडिया सुगावा लागल्याशिवाय बातमी देत नाही हे आपल्यालाही माहित आहे,आपण कोंबडे किती दिवस झाकणार आहात.

- संजय जेवरीकर, ज्येष्ठ पत्रकार, औरंगाबाद


............................................................ 

"जे रोज देवेंद्रभाऊंना "बातम्या पुरवतात" त्यांनी "काही काळ आपली दुकानदारी थांबवून" समाचार घ्यायला हवा!

● दुकानदारी शब्द मागे घेऊन जाहीर माफी मागायला हवी...

... आहे, एक तरी "माई का लाल" आहे... संजयराव जेवरीकर... अभिनंदन! आम्हा सर्व षंढ, नपुसंक, बिनकण्याच्या, दुकानदार पत्रकारांच्या फौजेत आपण एक मर्द शिलेदार निघालात...

💐💐 अभिनंदन!! 👍🏻👍🏻

जे मीडिया हाऊस फडणवीस आणि त्यांच्या पक्षाचे बटीक आहे...?

- हे समजला नाय जेवरीकर गुरुजी; कोण नाय ती यादी छोटी होईल!!
 ......


● आज दुकानंदारांकडे लंपट, लोचटपणे आलेले राजकीय ग्राहक कोण-कोण आहेत?

*आजच्या दुकानदार परिषदांचा तपशील काय आहे? कोण-कोणत्या दुकानदारांना किती माल वाटप करण्यात आला?*

● मुंबईत तिघे दुकानंदारांकडे आलेत, एक पक्ष आणि दोन व्यक्ती. पक्ष मॉल सम्राटासह सत्तेत सामील, व्यक्ती मॉलवाल्याच्या पार्टीतील... 

● राज्यभरातील दुकानंदारांचा आजचा काही तपशील?

*एकातरी पत्रकार संघटनेने,  अधिकृत पत्रक काढून, "दुकानदारी"च्या वक्तव्याचा निषेध केला का? या कसल्या संघटना मग? एकतर हे दुकानदारी करतात म्हणजे नाहीतर मग शेपूट घालून मूग गिळण्याचे कारण काय? पत्रकार संघटनांचे हे नंपुसक वर्तन संतापजनक व चीड आणणारे आहे... आम्ही सारे पत्रकार एकतर दुकानदार आहोत; नाहीतर मग षंढ तरी!*

● असेल लाज तर काढा निषेधपत्रके, मॉलवाला जाहीर माफी मागेपर्यंत मॉलवाल्यांचा माल आपल्या दुकानातून खपविणे बंद करा... *न पेक्षा या षंढांच्या संघटनांना टाळे ठोका; बंद करा दुकाने आणि दुकानदारी!*

● लाज वाटतेय आता पत्रकार असल्याची!!
- विक्रांत पाटील, कार्यकारी संपादक, जनशक्ती, मुंबई
Vikrant@Journalist.Com