प्रसाद काथे झी २४ तासच्या वाटेवर

मुंबई - न्यूज १८ लोकमतमध्ये डॉ उदय निरगुडकर यांना डोक्यावर बसवल्यामुळे संपादक प्रसाद काथे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. काथे उद्या १ मे रोजी झी २४ तास मध्ये जॉईन होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काळू मामा आणि शुगरे टेन्शनमध्ये आले आहेत. तर गुडगुडकरचे पठ्ठे न्यूज 18 लोकमतला पळणार आहेत.दरम्यान कुवळेकर मास्तरांच्या दमबाजीमुळे नवं टेन्शन निर्माण झालं आहे.

नेटवर्क 18 मध्ये जल्लोष
प्रसाद काथेंचा शेवटचा दिवस पार पडल्यानंतर उशीर गँगनं जल्लोष केला. काथे यांनी उशीर गँगला कामाला लावलं होतं. त्यामुळे उशीर, तोडकमोडक नाराज होते. ही गँग आता गुडगुडकरच्या विरोधात मेलबाजी करत आहे. या गँगला काही रिपोर्टरही सामील झाले आहेत.

टीव्ही 9 मध्ये गळती सुरूच
मागील एक वर्षात २५ पेक्षा जास्त जणांनी टीव्ही 9 सोडलं. आता जूनपर्यंत किमान ७ ते ८ जण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. अनेक जण बाहेर इंटरव्ह्यू देऊन आले आहेत. चॅनेलमध्ये चार वर्ष झालेले एम्पलॉयी बाहेर पडत असल्यानं समस्या निर्माण होणार आहेत. त्यातच सुट्ट्यांचे प्रॉब्लेम असल्यानं दुस-या चॅनेलमधून 

टीव्ही ९ चे इनपुट हेड सचिन परब यांनी   नुकताच  राजीनामा दिला असून त्यांच्या जागेवर एका अमराठी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे

जय महाराष्ट्रला कर्मचारी मिळेनात
जय महाराष्ट्रमध्ये सर्व इन्टर्न भरले आहेत. अनुभवी कर्मचारी नाहीत. वेगवेगळ्या चॅनेलमधून सिनीअर येऊन जात आहेत. पण कोणीही जॉईन होत नाही. त्यामुळे जय महाराष्ट्रमधल्या संपादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पगार वेळेवर होत नाहीत अशी भीती असल्याने अनुभवी कर्मचारी जॉईन होत नसल्याचे समजते. दरम्यान जुन्या कर्मचाऱ्यांना ३ ते ६ हजार वेतनवाढ करण्यात आली आहे.