एबीपीचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांचा राजीनामा

नवी दिल्ली - एबीपी  न्यूज चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक तथा मुख्य संपादक मिलिंद खांडेकर यांनी अचानक राजीनामा दिल्याने एबीपी ग्रुपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला की त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नवे व्यवस्थापकीय संपादक  म्हणून सहायक व्यवस्थापकीय संपादक  असलेले रजनीश आहुजा यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

मिलिंद खांडेकर  हे मागील १४ वर्षापासून एबीपी ग्रुपमध्ये कार्यरत होते. हिंदी, मराठी, गुजराथी, बंगाली या चारही चॅनलचे ते  व्यवस्थापकीय संपादक तथा मुख्य संपादक  होते. डिजिटल संपादक पदाचा चार्ज देखील त्यांच्याकडे होता. एबीपी ग्रुप टॉपवर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, पण अलीकडे एबीपीची घसरण सुरु झाली होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे एबीपी ग्रुपमध्ये आज भूकंप झाला आहे.

मिलिंद खांडेकर गेल्यामुळे त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले असून, अनेक विकेट पडण्याची शक्यता आहेत. त्यात एबीपी ( हिंदी) महाराष्ट्र ब्युरो आणि एबीपी माझामधील काही लोकांची विकेट जाईल, अशी शक्यता आहे.