झी २४ तास रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांची धक्काबुक्की

उस्मानाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झी २४ तास रिपोर्टर  मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याने राज्यातील अनेक पत्रकारांनी  निषेध व्यक्त केला असून, मुजोरी करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.

उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संत साहित्यावरील परिसंवादा दरम्यान वाद झाला.  एका वक्त्याने संत साहित्यामुळे बुवाबाजी होते, असे मत व्यक्त करताच लातूर येथील पत्रकार  जगन्नाथ पाटील यांनी त्यास आक्षेप घेवून  आपले म्हणणे मांडण्यास संधी द्यावी, म्हणून व्यासपीठावर  गोंधळ घातला. यावेळी संयोजक त्यास धक्का बुक्की करून बाहेर काढत होते, यावेळी त्याची झी २४ तास रिपोर्टर  मुस्तान मिर्झा शूटिंग करीत असताना, पोलीस उप निरीक्षक दिनेश जाधव आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवा गवळी यांनी धक्काबुक्की करून सभागृहाच्या बाहेर हाकलून लावले. यावेळी संयोजक असलेले दोन पत्रकार मूग गिळून गप्प होते, हे विशेष.

साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी मुंबई तरुण भारतचे पत्रकार सोमेश कोळगे यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. त्यानंतर आज झी २४ तासचे रिपोर्टर मुस्तान मिर्झा  यांना धक्काबुक्की करण्यात आली.

उस्मानाबादचे निष्क्रिय पोलीस अधीक्षक राजतिलक रोशनच्या राज्यात पोलिसांची  मुजोरी वाढली  आहे. त्याचा  प्रत्यय वेळोवेळी येत आहे. पत्रकार म्हटले की, पोलीस टार्गेट करीत असून येनकेन प्रकारे पत्रकारांची मुस्कटदाबी सुरु आहे.


झी २४ तास रिपोर्टर  मुस्तान मिर्झा यांना झालेल्या धक्काबुक्कीचा राज्यातील पत्रकारांनी   निषेध व्यक्त केला आहे. धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस उप निरीक्षक दिनेश जाधव आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवा गवळी यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी होत आहे.


मुंबई तरुण भारत पत्रकार सोमेश कोळगे यांचा आरोप
कोणतेही कारण न सांगता अटकेचे प्रयत्न 


उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संत साहित्यावरील परिसंवादादरम्यान वाद झाला. एका वक्त्याने संत साहित्यामुळे बुवाबाजी होते, असे मत व्यक्त करताच लातूर येथील पत्रकार जगन्नाथ पाटील यांनी त्यास आक्षेप घेवून आपले म्हणणे मांडण्यास संधी द्यावी, म्हणून व्यासपीठावर गोंधळ घातला . यावेळी संयोजकांनी त्यास धक्का बुक्की करून बाहेर काढले.