दिवाळीच्या मुहूर्तावर म.टा.चा फटाका फुटणार

औरंगाबाद - दिवाळीच्या मुहूर्तावर औरंगाबादेत महाराष्ट्र टाइम्स सुरू होणार असून,म.टा.त जाण्यासाठी दिव्य मराठी, सकाळ आणि लोकमतमधील रिपोर्टर व उपसंपादकांत चढाओढ लागली आहे.
पुणे, नाशिक पाठोपाठ महाराष्ट्र टाइम्स आता मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेतून लवकरच सुरू होणार आहे.म.टा.ने औरंगाबादेत आपले पाय ठेवताना  प्रिंटीग युनिट स्वतंत्ररित्या न टाकता लोकसत्ताचे वापरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
दरम्यान, संपादकीय स्टॉप निवडण्यासाठी संपादक अशोक पानवलकर व पुण्याचे निवासी संपादक पराग करंदीकर हे  दोन दिवस औरंगाबादेत तळ ठोकून होते.त्यांनी जालना रोडवरील टाइम्स ऑफ इंडियाच्या कार्यालयात  इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.इच्छुकांत सर्वाधिक संख्या दिव्य मराठीतील दिसून आली.याचाच अर्थ अवघ्या पाच महिन्यात दिव्य मराठीला अनेकजण कंटाळल्याची आमची माहिती सत्य निघाली आहे.
दिव्य मराठीतील ब्युरो चिफ श्रीकांत सराफ यांच्यासह रोशनी शिंपी,दिलीप वाघमारे,नितीन सुल्तान्पुरे,सुलक्षणा पाटील, निखील निरखी,दिनेश गुप्ता,भरत जाधव,विद्या गावंडे,कल्याण देशमुख,सतिश वैराळकर, फोटोग्राफर किशोर निकम, अरुण तळेकर यांच्यासह अनेकांनी म.टा.साठी मुलाखत दिली...
विशेष म्हणजे श्रीकांत सराफ यांच्या नेतृत्वाखाली हा मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला.  डीएम मध्ये बॉस म्हणून काम पाहणारे श्रीकांत सराफ रांगेत ट्रेनी लोकांसोबत मुलाखतीला हजर होते. मुलाखत कशी द्यायची, घाबरायचे नाही , विचारलेल्या प्रश्नांना अचूक उत्तर द्यायचे, नाहीच जमले तर आपले दिव्य मराठी आहेच अशा शब्दात श्रीकांत सराफ  आपले कर्तव्य पार पडत होते.  निवासी संपादक पराग करंदीकर हे पुर्वी सकाळमध्ये होते.तेव्हापासून आपले मित्र आहेत. सर्वाचे काम नक्की करून टाकतो , असे आश्वासन सराफ आपल्या ट्रेनी लोकांना  दिल्याची माहिती हाती आली आहे.
दिव्य मराठी पाठोपाठ सकाळमधील इच्छुकांची गर्दी दिसली.श्रीपाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, रणजित खंदारे, शेखलाल शेख यांनी मुलाखत दिल्याचे सांगण्यात आले. लोकमतमधील प्रशांत तेलवाडकर व मुजीब देवणीकर या दोघांनीच मुलाखती दिल्या असून, तेलवाडकर यांचे काम फिक्स झाल्याचे समजते.सकाळ सोडून पुढारीत गेलेले देवेंद्र इनामदार यांनीही म.टा.त दाळ शिजते का म्हणून चाचपणी केली.

ब्युरोसाठी माने - वरकडमध्ये रस्सीखेच

महाराष्ट्र टाइम्सचे ब्युरो चिफ होण्यासाठी लोकसत्ताचे प्रमोद माने व आय.बी.एन.लोकमतचे संजय वरकड यांच्यात जोरदार रस्सीखेच चालू असून,वरकड यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
म.टा.साठी मुलाखत दिलेल्या सर्वांना बेरक्याच्या शुभेच्छा....

ता.क.- म.टा.च्या औरंगाबाद आवृत्तीची सुत्रे सध्या पुण्याचे निवासी संपादक पराग करंदीकर यांच्याकडे असली तरी ऐनवेळी औरंगाबादसाठी निवासी संपादक म्हणून शैलेश लांबे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.शैलेश लांबे हे दिव्य मराठीचे निवासी संपादक धनंजय लांबे यांचे भाऊ असून, सध्या TIMES NOW मध्ये आहेत.

Post a Comment

1 Comments