आरोपींना अटक करण्याची पत्रकार संघाची मागणी

परळी - येथील पत्रकार प्रेमनाथ कदम यांच्यावर भ्याड हल्ला करणा-या गुंड आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी परळी पत्रकार संघाने एका निवेदनाद्वारे परळी तहसिलदाराना केली आहे.
याबाबत आज दि. २ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना परळी येथील पत्रकार संघाने तहसिलदारामार्फत मागणीचे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, परळी वैजनाथ येथील शासकीय गोडाऊन येथे तपासणीसाठी वरिष्ठ अधिकारी आल्याची माहिती पत्रकार प्रेमनाथ कदम यांना कळाली. त्यामुळे वृत्त संकलनासाठी कदम शासकीय गोडाऊन येथे गेले असता गोडाऊन किपर सोळंके यांची बाजु घेऊन आरोपी संतोष मस्के व त्याच्या साथीदाराने भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात कदम यांच्या पाठीला, खांद्याला गंभीर दुखापत झाली तर डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर परळी उपजिल्हा रूग्णालयात उपचार चालू आहेत.
या घटनेतील आरोपीला अटक करण्याची मागणी परळी शहर तालुका पत्रकार संघाने केली आहे. या निवेदनावर परळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, शहराध्यक्ष धिरज जंगले, दिलीप बद्दर, संजय खाकरे, ज्ञानोबा सुरवसे, प्रकाश सुर्यकर, रानबा गायकवाड, रामप्रसाद शर्मा, बाळासाहेब कडबाने, प्रा. रविंद्र जोशी, मोहन व्हावळे, परमेश्वर भोसले, धनंजय आढाव, आत्मलिंग शेटे, कैलास डुमणे, नृसिंह अनलदास, अनुप कुसूमकर, धनंजय आरबुने, संतोष बारटक्के, समीर इनामदार, पप्पु कुलकर्णी, भगवान साकसमुदे, बालासाहेब जगतकर आदींच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या