जागतिकीकरणावरील कविता अखेर मालकाला केल्या अर्पण...

बुरख्यातील संपादक या सदरासाठी मजकुर मिळावा म्हणून नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई आणि गोव्यातील काही पत्रकार मित्रांना फोन केले. अनेकांनी लहान मोठे किस्से सांगितले. त्यात काही रंजक आहेत. काही गमतीचे आहेत. काही संपादकाकडून होणार्‍या त्रासाचे आहेत. काही डोळ्यांत पाणी आणणारे आहेत. या सार्‍यातून पहिला किस्सा कोणाचा करावा या विषयी संभ्रम झाला. संपादक मंडळी सारीच मोठी असतात. पदाने, मालकाने दिलेल्या अधिकाराने आणि पगाराच्या गलेललठ्ठ पॅकेजने. ती कामाने, मनाने मोठी असतात की नाही...प्रश्‍नच.
हं तर मी काय सांगत होतो... पहिल्या सदरासाठी व्यक्तीही तेवढ्याच तोलामोली हवी. मग किस्सा निवडला नाशिकच्या एका मुख्य संपादकाचा. पुण्याहून प्रसिद्ध होणार्‍या साखळी वृत्तपत्राच्या, मुंबईतून प्रसारण करणार्‍या वृत्तवाहिनीच्या, विविध मासिकांच्या मुख्य संपादकाचा. आपण कशा काशाचे मुख्य संपादक आहोत, हेच न कळणारे एक कोडे. मालकालाही माहित नाही की, आपल्या प्रकाशनात, समुहात कुठे कुठे मुख्य संपादकाचे नाव छापावे लागते किंवा टी. व्ही वर दाखवावे लागते. मुख्य संपादक महाशय मात्र नियुक्ती झाली तेव्हा समुहाच्या सार्‍या प्रकाशन आणि प्रसारणावर लक्ष टठेवून होते...कुठे माजे नाव मुख्य संपादक म्हणून छापून येत नाही म्हणून.
मी काही सांगयला लागलो की नेहमी विषयांतर होते. आता आपण पन्हा आपल्या सदराकडे येवू. तर विषय होता, मोठ्या पदाच्या संपादकापासून किस्से सुरू करण्याचा. नाशिकचे हे मुख्य संपादक बातम्या, लेख लिहीतात. त्याचे पुस्तकही करतात. नंतर त्या पुस्तकांना पुरस्कारही मिळतात. नंतर नंतर त्यांनी कविता पाडणे सुरू केले. पत्रकारिता, साहित्य, काव्य असा प्रांतातला हा माणूस खरे तर अजून चित्रपटात कसा गेला नाही? मोठ्या बापाचा सहवास (कुसुमाग्रज), दत्तक बापाचा सहवास (नारायण सुर्वे), लोककवीचा सहवास (वामनदादा कर्डक) असूनही मुख्य संपादक अजूनही चित्रपटाच्या प्रांतात नाहीत. वृत्तपत्र समुहाने एखादा चित्रपट काढलाच तर निर्माता म्हणून यांचे नाव येईलचकी. मी पुन्हा पुन्हा विषयांतर करतो. तर मी काय सांगत होतो...पहिला किस्सा नाशिकच्या मुख्य संपादकापासूनच सुरू करावा हे ठरले.
पुण्याच्या वृत्तपत्र समुहाने काही वर्षांपूर्वी अंतर्गत प्रशिक्षणांचे सत्र सुरू केले होते. बदलत्या काळात पुण्याच्या वृत्तपत्र समुहाच्या युवा मालकामध्ये आपला विश्‍वासाह पेपर नागपूर शेटजींच्या वृत्तपत्र समुहापुढे क्रमांक एकवर नेण्याची  महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. काही नव्या लोकांना हातीशी घेवून संपादकिय नवी टीम तयार केली. या नव्या लोकांमध्ये तेव्हाच्या नाशिकच्या संपादकांची (आताचे मुख्य संपादक) गरज नाही म्हणून त्यांना दूर बसविण्यात आले. अर्थांत, त्यावेळी पेपरात दिलेल्या बातमीत पदोन्नतीवर हा शब्दप्रयोग करायला ,ंपादक विसरले नाहीत. त्यानंतर कधीही अशी पदोन्नतीची बातमी वाचनात आली नाही. तीन-  साडेतीन वर्षांचा काळ गेला. या काळात वृत्तपत्राचा प्रत्येक माणूस म्हणता होता...जागतिकीकरण, मल्टीमीडिया, कॉन्वर्जन्स असे काही काही...मात्र एके दिवशी मालकाला लहर आली. ते म्हणाले, यूस लेस...त्यांनी काही लोकांना अक्षरशः रात्रीतून हाकलून लावले. राजीनामे द्या असे निरोप दिले. आता खुर्च्या रिकाम्या केल्यावर त्या भराव्या लागतातच. शिंक्याचे तुटले ाणि बोक्याचे फावले. नाशिकला अडगळीत नेटवर्क चालवणार्‍या संपादकांच्या गळ्या मुख्य संपादकपदाची माळ पडली. त्यानंतर घडले ते सार्‍याच माध्यमात मुख्य संपादक म्हणून माझे नाव हवेचा हट्ट...या बाबात तेव्हाचे सरव्यवस्थापक अनेक रंजक हकिकती सांगतात...त्याही ओघात येतील.
नेटवर्कचे काम पाहताना संपादक असलेल्या महोदयांनी जागतिकीकरण विषयावरील कवितांचे संपादन करीत एक काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्याची भलावण संस्तांतर्गत होणार्‍या संपादकांच्या व्हीसीतून केली. मात्र, मालकाच्या लहरीपणाची कल्पना असल्याने त्यांचा विश्‍वास कसा व किती दिवस टीकवून ठेवावा याची भ्रांत असलेल्या मुख्य संपादकांनी कविताही करायला (कोणीतरी प्राध्यापकाने लिहीले आहे की कविता पाडायला) सुरूवात केली.
मालक जागतिकीकरणावर बोलतो म्हटल्यावर मुख्य संपादकांनी त्याच विषयावर कविता केल्या. याबाबत त्यांनी कधीतरी मालकाशी रात्री उशिरापर्यंत केलेल्या चर्चेची नोंद केली आहे. ती करताना कवितांचे हे पुस्तक मालकालाच अर्पण केले आहे... बहुधा ही चलाखी फार थोड्या लोकांना माहित असावी. अर्थात मालकाची कधी जाहीर प्रतिक्रीया यावर कधीही समोर आली नाही.
मुख्य संपादकांच्या मित्रांचची साहित्य वर्तुळात साखळी आहे. पुण्यातून, मुंबईतून, कोल्हापुरातून, नागपुरातून किंवा थेट कर्नाटकातूनही एखाद्या पुस्तकाला पुरस्कार द्यायचा असेल तर ही मंडळी एकमेकांच्या संपर्कात येतात. पुरस्कारसाठी पाठवायच्या शिफारस पत्रिका नेमक्या व्यक्तींच्या हातात पडतात. फोना फोनी होवून मी तुझे, तू त्याचे, त्याने माझे नाव कसे सूचवावे हे ठरते. त्यानंतर काही दिवसांनी पुरस्कार जाहीर होताना एकमेकांच्या सहकार्याचे हे वर्तुळ पूर्ण होते...
(मुख्य संपादकांचा हा बुरख्यातला चेहरा तुम्हाला आवडला असेल तर इतरांनाही लिंक पाठवा... आवडल्याचे नोंदवा)

सविस्तर वाचा
 On Facebook - Burkhyatil Sampadak

बुरख्यातील संपादकासाठी माहिती पाठवा
burkhyatil.sampadak@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या