पत्रकारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

महाराष्ट्रातील पत्रकारांवर होत असलेल्या हल्लयाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार निष्क्रीय असून पत्रकारांना संरक्षण देण्याच्यादृष्टीने सरकार कोणताच निर्णय घेत नाही.पत्रकार संरक्षण कायदा व्हावा या मागणीसाठी आपण गेली सात वर्षे सनदशीर मार्गानं आपण लढतो आहोत.सरकार त्याची दखल घेत नाही.त्यामुळंच आता आपणास दिल्ली गाठावी लागत आहे.१ मे २०१२ रोजी आपण दिल्लीत आंदोलन करणार आहोतच पण त्या अगोदर आता "पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती'चं एक शिष्टमंडळ महामहिम राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील यांची २२ तारखेला ११.३० वाजता दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात भेट घेत आहे. यावेळी महाराष्ट्रातील पत्रकारांची कैफियत आम्ही त्यांच्या कानी घालणार आहोत.तसेच "पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती'नं जी श्वेतपत्रिका तयार केली आहे ती देखील राष्ट्रपती महोदयंाना सादर केली जाणार आहे.या व्हाईट पेपरमध्ये अलिकडच्या काळात महाराष्ट्रतील ज्या २१२ पत्रकारांवर हल्ले झाले त्यातील शंभर घटनांची माहिती तपशिलानं दिलेली आहे.तसेच माध्यमांच्या कार्यालयावरील हल्ले आणि राज्यातील पत्रकारांच्या झालेल्या हत्त्या याचीही माहिती त्यात देण्यात आली आहे.
याच दौऱ्यात आम्ही प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या.मार्कन्डेय काटजू तसेच केंद्रीय कायदा मंत्र्यांचीही आम्ही भेट घेत आहोत.दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊनही महाराष्ट्रतील पत्रकार कोणत्या स्थितीत काम करीत आहेत हे जगाच्या वेशीवर मांडले जाणार आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा हा दौरा यशस्वी व्हावा यासाठी आम्हाला आपल्या शुभेच्छा आणि खंबीर पाठिंब्याची गरज आहे.
एस.एम.देशमुख

Post a Comment

0 Comments