दिव्य मराठीची फायनल टीम तयार

सोलापूर - सोलापुरात लवकरच सुरू होणा-या दिव्य मराठीची फायनल टीम अखेर तयार झाली आहे. ही टीम ब-यापैकी असल्याची चर्चा सध्या सोलापुरात चालू आहे.
ही आहे सोलापूर दिव्य मराठीची टीम :
संजीव पिंपरकर ( निवासी संपादक), श्रीकांत कात्रे व आयुब कादरी ( वृत्त संपादक)
उपसंपादक : यशवंत पोफळे,  अमोल अंकुलकर,  सुदर्शन सुतार, ह्यात महमंद पठाण
रिपोर्टर : मनोज व्हटकर (चिफ), चंद्रकांत मिराखोर, श्रीनिवास दासरी, विनोद कामतकर, रामेश्वर विभुते, अजित बिराजदार, संजय जाधव, अजित संगवे, अश्विनी तडवळकर, रामदास काटकर (प्रेस फोटोग्राफर)

दिवाणजीमुळे सकाळला गळती
सोलापूर सकाळमधील जवळपास ७० टक्के उपसंपादक व रिपोर्टर सकाळ सोडून दिव्य मराठीत गेले आहेत.त्याला चार महिन्यापुर्वी पुढारी सोडून सकाळमध्ये आलले अभय दिवाणजी हे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.दिवाणजीच्या चिडखोर व धरसोड वृत्तीमुळे सकाळला गळती लागली आहे. गोविंद घोळवे यांच्या कृपेमुळे दिवाणजीचा सकाळमध्ये प्रवेश झाला परंतु आता दिवाणजींनी चांगलाच घोळ सुरू केला आहे.
सहयोगी संपादक दयानंद माने यांचे थंड धोरण व दिवाणजींच्या चीडखोर वृत्तीमुळे सोलापूर सकाळ शेवटची घटका मोजत आहे.सध्या सोलापूर सकाळमध्ये ७० टक्के जागा शिल्लक जागा असून, बाहेरच्या आवृत्तीतून कर्मचारी आणून वेळ भागवली जात आहे.त्यामुळे दररोज चुकांवर चुका घडत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या