बोलावणे आले म्हणून संस्थेला ब्लॅकमेल

औरंगाबाद - आम्हाला प्रतिस्पर्धी दैनिकाचे बोलावणे आले आहे, ऐवढी पगार देतो म्हणतात, तुम्ही वाढवून दिली तर थांबतो,नाही तर जातो, अशी धमकी देवून लोकमत, सकाळ व दिव्य मराठीतील काही महाभाग संस्थेला ब्लॅकमेल करीत असल्याची माहिती हाती आली आहे.
गेल्या वर्षी याच महिन्यात भास्कर ग्रुपच्या दिव्य मराठीचे औरंगाबादेत आगमन झाले आणि कधी नव्हे ऐवढे प्रिंट मीडियाला चांगले दिवस आले.दिव्य मराठीने सकाळ व लोकमतला टार्गेट केल्यामुळे या दोन्ही दैनिकातील कर्मचा-यांचा भाव वधारला.त्यांना दिव्य मराठीने दुप्पट पगार देवून आपल्या कळपात ओढले, पण गंमत अशी की, ज्यांची लायकी नाही, अशांनाही त्यांना घेतले.परिणामी भेदरलेल्या लोकमत व सकाळनेही आपल्या कर्मचा-यांना नाईलाजास्तव पगारवाढ केली.
औरंगाबाद पाठोपाठ दिव्य मराठीने नाशिक, जळगाव व सोलापुरात पाऊल ठेवले.तेथेही लोकमत, सकाळ कर्मचा-यांचा भाव वधारला.जेथे दिव्य मराठी तेथे पगारवाढ असे धोरण लोकमत,सकाळने ठेवले आहे.गंमत अशी की, ज्यांची खरोखरच लायकी आहे,त्यांना पगारवाढ झाली तर आनंदच आहे, पण ज्यांना चार ओळी नीट लिहिता येत नाही, अशा महाभागांना आंधळे गबाळ लागले आहे.
लोकमतच्या ऋषी बाबूंनी तर कर्मचारी फुटाफुटाचा चांगलाच धसका घेतल्याचे समजते.ओ जा रहा है क्या, कोण - कोण जाणे वाले है, याचा आढावाच ते दररोज घेत असल्याचे समजते.त्यामुळे बिचा-या संबंधितांना दररोजची कामे सोडून त्यांची उत्तरे तयार ठेवावी लागत आहे.त्यात गंमत अशी की, असा अहवाल देताना संबंधितांना हासावे का रडावे झाले आहे.कारण ज्याची लायकी नाही,तेच जास्त ब्लॅकमेल करीत आहेत.या ब्लॅकमेलपणाला कंटाळून लोकमत, सकाळ व दिव्य मराठीने ज्यांना जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे, असा पवित्रा घेतल्याचे समजते.ताजा कलम : मोठ्या अपेक्षेने दिव्य मराठीत गेलेले एकूण ४७ जण वर्षभरात सोडून गेले आहे.ते स्वत:हून निघाले का, त्यांना हाकलले हा संशोधनाचा विषय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या