अकोला - कर्मचाऱ्यांची
पिळवणूक, नीच दर्जाची वागणूक आणि छळासाठी वृत्तपत्र सृष्टीत अग्रणी
असलेल्या देशोन्नती व्यवस्थापनाने नुकताच एक धक्कादायक निर्णय घेऊन सुमारे २५० अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. संपादकीय विभागातील
कर्मचाऱ्यांसह वितरण, जाहिरात विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांचे राजीनामे
घेण्यात आले आहेत.. यामुळे देशोन्नतीमध्ये मोठा भूकंप झाला असून
कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या कित्तेक वर्षांपासून काम
करणाऱ्या कर्मचाऱ्याची सेवा जेष्टता कमी केल्यामुळे भविष्य निर्वाह
निधीमध्ये कंपनीला अधिक रक्कम टाकावी लागणार नसून दरवर्षी २० लाखाची बचत
होणार असल्याची कल्पना देशोन्नतीचे मालक प्रकाश पोहरे आणि रिशी पोहरे
त्यांच्या काळ्या पैशाचा हिशेब बघणाऱ्याला सुचली कर्मचाऱ्यांचे राजीनामे
घ्यायचे, त्यांची सेवा खंडित करायची आणि नंतर त्यांना दुसऱ्याच कंपनीचे
कर्मचारी दाखवून करार पद्धतीने पुन्हा सेवेत घ्यायचे.. अशी नीच खेळी
खेळल्या गेली आहे. त्यासाठी सर्वांचेच राजीनामे घेण्यात आले असून ते आता
देशोन्नतीचे कर्मचारीच नाहीत असा बनाव निर्माण करण्यात आला आहे... यामुळे
देशोन्नतीला पी.एफ. , व्यवसाय कर, इत्यादीसाठी जादा खर्च करावा लगणार
नाही.. आधीच नियमाप्रमाणे वेतन दिल्या जात नसून, जादा रकमेवर सह्या घेऊन
कमी पगार द्यायचा... कर्मचाऱ्यांची पिळवणूक करायची परंपरा जोपासणाऱ्या
देशोन्नतीने सर्वांचे राजीनामे घेताना याची तक्रार कराल तर याद राखा अश्या
धमक्याही दिल्या आहेत. आधीच जीव मुठीत धरून काम करणारे कर्मचारी यामुळे
अधिक घाबरले असून ..... आता आपण दुसऱ्याच कागदोपत्री अस्तित्व असलेल्या
कंपनीचे कर्मचारी राहणार असून काम करताना मात्र पोहरे यांच्याच दावणीला
बांधून राहावे लागणार असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... पी. एफ.
च्या रेकॉर्डवरील जेष्टता जाणार असून अनेकांचे मोठे नुकसान होणार आहे...
जे अनेक वर्षापासून काम करीत आहेत त्यानाही या तुघलकी निर्णयाचा फटका बसला
आहे. यामुळे कर्मचारी प्रचंड नाराज झाले असून.... पोहरेला शिव्यांची
लाखोली वाहत आहेत... कर्मचार्यांची पिळवणूक करायची आणि त्यातून वाचलेल्या
पैशावर मौज करायचे काम पोहरे आणि त्यांच्या चांडाळ चौकडीने गेल्या कित्तेक
वर्षापासून chalvile आहे... कर्मचाऱ्यांचे रक्त पिऊन , जाहिरातीतला मलिदा,
तालुका प्रतिनिधी, बी.एम. कडून दरमहा मिळणारा मलिदा लाटून गब्बर झालेला
सापधार्य्या गरुडीची बिन जशी वाजत आहे तसेच पोहरे पिता-पुत्र डोलत
असल्यामुळेच देशोन्नतीचे वाटोळे होत असून... मुक्या बिचार्या संपादकाची
नुसती टोलवाटोलवी सुरु आहे... ज्यांचे राजीनामे घेतले आहेत त्या
कर्मचार्यांना पर्याय नसल्यामुळे ते तेथेच काम करीत असून आपले भले करायला
दुसरे मोठे पेपर आले की कित्तेक वर्षांपासून पिळवणूक करणाऱ्या पोहरे आणि
त्याच्या चपात्यांची चागलीच वाट लाऊ अशी चर्चा सुरु आहे...