साम मराठीने सहा कर्मचा-यांना दिला नारळ ...

साम मराठी वाहिनीनेही तिच्या लौकिकाला साजणारा 'उत्तुंग षटकार' लगावत सहा कर्मचा-यांना नारळ दिलाय. मागच्याच महिन्यात चौकार लगावत चौघांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. साममध्ये दर महिन्याला एक - दोघांची कत्तल ही ठरलेलीच असते. वरिष्ठांना किती कर्मचा-यांकडून काम करून घ्यायचे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे भरमसाठ नोकर भरती केली जाते. तोटा व्हायला लागल्यावर याच कर्मचा-यांचा बळी दिला जातो, वरिष्ठ मात्र मजा करत राहतात. चार वर्ष झाली तरी साम अजून रांगतच आहे. ई टीव्हीच्या मानसिकतेतून हे चॅनेल अजूनही बाहेर पडलेलं नाही. अशोक सुरवसे आणि गँगने त्यांच्या मर्जीतले ई टीव्हीतले बुलेटिन प्रोड्युसर आणि लाळघोटेपणा करणारे रिपोर्टर भरले मग काय ? चॅनेलची वाट लागणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
आणि जग जिंकायला निघालेले वागळे आणि कंपनी त्यांचे कर्मचारीही जपू शकले नाही. तिथल्या एका फणसाने अनेक बुलेटिन प्रोड्युसरला वाईट वागणूक दिली. रिपोर्टर लोकांनाही वाईट पद्धतीनं छळलं. मात्र स्त्रीयांच्या बाबतीत तो चांगलाच उ'दार' होता. आयबीएन - लोकमतची वाट लावल्यानंतर हे पार्सल आता झी २४ तासच्या वाटेवर आहे. देवा, या चॅनेलला तरी बुडू देऊ नको. कारण आतापर्यंत फक्त झी २४ तासमधूनच कर्मचा-यांना रिसेशनमध्ये किंवा चॅनेलला तोटा झाला म्हणून काढण्यात आलेलं नाही. स्टार माझानंही कमीत कमी कर्मचा-यांकडून काम करून घेतलं. भरमसाठ लोक घेतले नाही. परिणामी स्टार माझा आजही एक नंबर आहे.

Post a Comment

0 Comments