पगार वाढीनंतरही सकाळमध्ये नाराजी कायमच

पुणे - कामांचे कथित मूल्यमापन केल्यानंतर करण्यात आलेल्या वेतन वाढीनंतरही सकाळ मधील कर्माचा-यांमध्ये अजूनही प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे पगार वाढीनंतर देखील सकाळमधून पुन्हा मोठा पोळा फुटणार आहे. इतर पेपरमधून सकाळमध्ये आलेल्या लोकांना कंपनीने १२ ते ५० हजार रुपये असा घसघशीत पगार देण्याचा सपाटा लावला आहे. याउलट सकाळमधील जे कर्मचारी खरच इतक्या मोठ्या पगाराच्या लायकीचे आहेत त्यांना मात्र  ४ हजार..९ हजार..१० हजार...१५ हजार अश्या वेतनावर नेऊन ठेवत सकाळने गधे आणि घोडे आमच्यासाठी सारखेच आहेत हे सिद्ध केले आहे.
सकाळमधील संगणक कर्मचारी कंपनीला रामराम ठोकत असल्याने अलीकडेच त्यांना एका तात्पुरत्या कंपनीच्या रेकोर्डवरून सकाळवर घेण्यात आले. परंतु त्यांच्या कडूनही तोच जुलुमी करार करून घेतल्या जाण्याची शक्यता आहे, ज्यात सकाळ सोडून गेलेले अनेक कर्मचारी अडकले आहेत. आपल्या जुन्या कर्माचा-यांवर अन्याय करण्याची सकाळची सवय खूप जुनी आहे. सकाळ व्यवस्थापन वृत्तपत्र जगतात पाटी कोरी असलेला एखादा कर्मचारी २० हजार रुपयांवर घेईल पण जुन्या कर्माचा-यांचे वेतन २० हजार करणार नाही. बर इतके प्रचंड वेतन देऊनही जो नवा कर्मचारी सकाळ घेते तो एक तर सकाळमधून सगळे काही शिकून घेतो आणि दुस-या कंपनीत दुप्पट वेतनावर निघून जातो. डिवचल्या जातो तो बिचारा जुना कर्मचारी. या वर्षी ही वेतनवाढ करताना हिच चूक पुन्हा सकाळने केली आहे. 
सकाळच्या या वागणुकीमुळे वेतनवाढ केल्यावरही कंपनीला कर्मचारी फुटीचा मोठा फटका सहन करावाच लागणार आहे. लवकरच भास्कर समुहाचा डीएम विदर्भात येत आहे. त्याने आपली पाळेमुळे जळगाव खानदेशातून विढर्भात पसरविणे सुरु केले आहे. महाराष्ट्र टाईम्स सुद्धा नागपुरातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. तिकडे भास्कर समुहाचा सर्वात मोठा स्पर्धक असलेला जागरण हा पेपर देखील महाराष्ट्रात येत आहे. अशात कर्माचा-यांना जाणीवपूर्वक दुखविण्याचा प्रचंड मोठा फटका सकाळला बसणार आहे, ज्याची कंपनीच्या अधिका-यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. या वेळी होणारी ही फुट इतकी गंभीर असेल, कि एकेकाळी सकाळची खरी ताकद असलेली 'क्रीम टीम' बाहेर पडेल. विशेष म्हणजे यंदा कर्मचारी सकाळने नोटीस दिल्यास सामुहिक वकील करून उलट कंपनीवरच भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत स्वातंत्र्यावर गदा आणणारा करार लिहून घेण्याचा खटला भरण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी सकाळने विनाकारण डिवचलेल्या लोकांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. हा सगळा प्रकार झाला नोकरी सोडून गेल्यावर सकाळने नोटीस बजावल्यास किंवा भविष्य निर्वाह निधीचा अर्ज लवकर न दिल्यास. परंतु त्यापूर्वी बाहेरून आलेल्यापेक्षा घरच्यांची ओंजळ जास्त रिकामी ठेवल्याच्या प्रकाराच जबर झटका सकाळला सोसावा लागणार आहे.  
खरेतर आपली कंपनी हे आपले एक कुटुंब असते हे सकाळकारांना कळीला हवे. पूर्वी असेच वातावरण सकाळमध्ये होते. कंपनीतील माणसांच्या कामाची आणि माणुसकीच कदर केल्या जात होती. जे खरोखर प्रामाणिक असतील त्यांना त्या प्रमाणे पद आणि पैसा दिल्या जात होता. परंतु सकाळची संध्याकाळ होऊ लागली आणि सुरु झाली उलट गिनती. या उलट गिनतिची चाहूल त्याच दिवशी लागली होती ज्यादिवशी सकाळ नावाच्या लहानश्या रोपट्याचे वटवृक्ष करणा-या विजयाताई पाटील यांना खड्यासारखे बाहेर काढण्यात आले. सकाळने कर्मचारी गळती रोखण्यासाठी काय नाही केल. धमक्या दिल्या...करार लिहून घेतले....सोडून गेलेल्या लोकांना वकिलामार्फत नोटीस बजावल्या...तरीही सकाळ सुडून जाणा-यांची गळती काही थांबली नाही. त्यामुळे सकाळने दहा वर्षाचे अहवाल.. गावांचे सर्वेक्षण...केआरए...स्कोरकार्ड... जाहिरात टार्गेट... फालतू आणि भिकारचोट बातम्यांमधून मिळणारी अंकवाढ... इवेन्टमधून पैसा.... परीक्षांमधून पैसा....यामागे न धावता आपल्या मुळ ब्रांडला मजबूत करण्याकडे जास्त लक्ष द्यावे. 
सकाळकरांनी पुण्यात बसून उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्येक युनिटच्या ठिकाणी जाऊन कर्माचा-यांशी संवाद साधावा. नेमकी वस्तुस्तिथी जाणून घ्यावी, सकाळचा खप आणखी कसा वाढेल यासाठी आपल्याकडे काय कमी आहे.. मनुष्यबळ...संगणक..इंटरनेट जोडण्या...मोडेम सेंटर... बातमीदारांना वेतन..युनिटच्या ठिकाणी बसलेल्या अधिका-यांनी चापलुसी यावर स्वतः लक्ष घालावे. आपली शेती पडीत ठेऊन दुस-याची बटाइने घेणे किंवा अति शहाण्या मजुरांच्या भरवश्यावर कसदार जमीन आणि भरलेले शेत सोडून झोप काढणारा नेहेमी गोत्यातच येतो या इसाप नीतीमधील गोष्टीतून काहीतरी बोध घ्यावा. त्यासाठी बाहेरहून कोणता सूर्या...सरदार... अथवा इतर कोणी खुर्चीत बसविण्याची गरज नाहीच.