सकाळ आई नाही आणि बापही

सकाळमधल्या आई पुराणाविषयी बेरक्यावर वाचले. तोपर्यंत आता गेल्या वेळच्या
सप्तरंग पुरवणीतील उत्तम कांबळेंची फिरस्ती बापावर आहे. यांचाच तेवढा बाप
बाकीच्यांचा बाप हा बाप नसावा, असे सारे हे वर्णन आहे. किती वेळा यांच्या
आईचे आणि यांच्या बापाचे पुराण वाचायचे? शिवाय यांच्या फिरस्तीला चांगले
म्हटले असेल, तरच ते वाचकांच्या पत्रव्यवहारात छापले जाते. हिंमत असेल,
तर हे पत्र छापून दाखवावे. पण तसे होणार नाही. कारण यांच्यावरची टीका कशी
प्रसिद्ध करणार? पुन्हा पुन्हा त्यांना तेच ते आईबाप लिहायला देणाऱया
सकाळ संस्थेलाच सध्या कोणी आई आणि बापही नसावा, म्हणूनच वाचकांच्या माथी
हे आईबाप पुन्हा पुन्हा मारले जात आहेत. आणखी किती काळ चांगल्या लिखाणाची
प्रतीक्षा सकाळच्या `मायबाप` वाचकांना (सकाळवाले मानत असतील, तर) करावी
लागणार आहे, ते (वाचकांचे) आईबापच जाणोत!

by Dhananjay Kartiki
dhananjay.kartiki@gmail.com