नाशिक - नाशिकमध्ये लोकमतची मक्तेदारी संपविण्यासाठी एका मोठ्या दैनिकाची गरज होती.डी.एम.आल्यानंतर आता लोकमतची मक्तेदारी संपेल, असे लोकांना वाटले होते,मात्र लोकमत आहे,तिथेच आहे, डी.एम.चा काडीचाही परिणाम झाला नाही.
नाशिकमध्ये लोकसत्तात चमकदार कामगिरी करणारे जयप्रकाश पवार डी.एम.ला अजूनही उभारी देवू शकले नाहीत.त्यांच्या नेतृत्वाखालील संपादकीय टीम लोकमतला अजूनही टफ देवू शकली नाही.डी.एम.बद्दल नाशिकमध्ये लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे.
भास्कर ग्रुपच्या डी.एम.ने गतवर्षी औरंगाबादहून सुरूवात केली.नंतर नाशिक,जळगाव,सोलापूर आवृत्ती सुरू केली.वर्षे झाले तरी मराठवाड्यातील नांदेड,लातूर,हिंगोली,परभणीला अजून अंक सुरू झालेला नाही.नगर शहरात अंक असला तरी नगर जिल्हा अजूनही बाकी आहे.डी.एम.चे पहिले बारा पाने म्हणजे उडप्पाचे जेवण वाटते.लोकांना मराठवाडा रसा हवा आहे.डी.एम.जोपर्यंत आक्रमक होत नाही,तोपर्यंत लोकमतशी स्पर्धा करू शकत नाही.
औरंगाबाद डी.एम.बरा असला तरी नगर,जळगाव आवृत्ती फेल असल्याचे सांगण्यात येत आहे.नाशिक,सोलापूर आवृत्ती जेमतेम आहे.आता डी.एम.ची कोल्हापूर,पुणे आवृत्तीची तयारी चालू असली तरी, जुना अनुभव पाहता, अनुभवी व चांगले पत्रकार डी.एम.कडे येण्यास इच्छुक नाहीत.मोठे पॅकेजचे त्यांना आमिष दाखविण्यात येते,मात्र हे पॅकेज संबंधिताची गरज संपल्यानंतर बंद होते,हेही नसे थोडके.
दैनिक दिव्य मराठी, नाशिक

0 टिप्पण्या