लोकमत समाचारचा नवभारत टाईम्सला आणि दिव्यमराठीचा सकाळला दणका

लोकमत वृत्तसमुहाने आता पुण्यात पाय रोवले आहेत. येत्या महिनाभरात लोकमत समाचार पूर्ण चौदा पानी रंगीत पेपर पुणेकरांच्या भेटीस येईल. त्यास्वरुपाच्या जाहिराती त्यांनी पुण्यातील चौकाचौकात लावल्या आहेत. या वर्तमानपत्राचा फटका पुण्यातील एकमेव हिंदी दैनिक आज का आनंद ला बसेल. आज का आनंदचे संपादक श्याम अगरवाल यांनी आपल्या समूहाची सूत्रे खासगी एजन्सीकडे दिल्यावर सर्वच आनंदीआनंद आहे. सकाळ आणि पाठोपाठ पुढारीतून हकालपट्टी केलेल्या आनंदने हा ग्रुप सावरण्यासठी आपल्या नेक्स्ट जनरेशनला लाखो रुपयांचे पॅकेज घेतले. पण सकाळी चिंतन एस् एमएस पाठविण्यापलिकडे त्यांची मजल गेली नाही. या समुहाचे नेक्स्ट 365 हे दैनिक तर पहिल्या दिवसपासून तोट्यात आहे. संध्यानंदचा आंग्ल अवतार असलेले हे दैनिक पुण्यातील कोणत्याही दैनिकाच्या आसपासही नाही.
 त्यातच आता लोकमत समाचारने टाईम्स ग्रुपच्या नवभारत टाईम्स या दैनिकाच्या संपादकापासून शिपायापर्यंतचा सर्व स्टाफ दुप्पट पगारावर घेतला. त्यामुळे, टाईम्सला दणका बसला. त्यांचे कार्यालय सुनसान पडले आहे. जाहिराती देऊनही त्यांच्यकडे कोणी वार्ताहर अद्याप्  गेलेला नाही. मटाचा पाय खोलात  जात असताना हिंदी दैनिकालाही फटका बसल्यामुळे टाईम्स ग्रुप चिंतीत झाला आहे.
                           दरम्यान, दिव्य मराठीने सकाळमधील एक मोठा ग्रुप गळाला लावला आहे. आपली स्पर्धा टाईम्सशी नसून सकाळशी आहे हे ओळखून तेथील संपादकीय विभागातील अस्वस्थ माळी-कडूसकर ग्रुप डीएम च्या गळाला लागला असल्याची चर्चा आहे. गेल्या रविवारी डीएम च्या खांडेकरांची आणि माळी-कडूसकर ग्रुपची कोथरुड  भागातील एका हॉटेलमध्ये दीर्घ बैठक झाली. त्यामध्ये सकाळमधील किमान् निम्मेजण माळी ग्रुपच्या नेतृत्वाखाली जाणार असल्याचे निश्चित झाले. सोशल इंहजिनीयरींगच्या नावाखाली श्रेष्ठ परंपरा असलेल्या सकाळमध्ये नंगानाच चालवलेल्या  घोळवें आणि ग्रुपच्या त्रासाला वैतागलेल्या माळी ग्रुपला डीएमतर्फे सकाळचे जुने निष्ठावंत उदयराव यांनी खांडेकरांशी संपर्क साधून दिला अशी माहिती आहे. एपींच्या निकट गेलेल्या उदय रावांची अचानक हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या ते डीएम साठी कार्यरत झाले आहेत. त्यांनीच हा बिग स्लाईस ऑफ केक डीएम ला मिळवून दिला आहे. विशेषम्हणजे आपल्यावर घोळ करणा-यांचा शिक्का नको अशी आता उपरती झालेल्या पाटलांच्या संभानेही माळी ग्रुप जॉईन करून घोळवेंना तोंडघशी पाडले आहे. ऑगस्टपासून डीएम चे प्राथमिक काम पुण्यातून् सुरू होईल. त्यानंतर डिसेंबरला पूर्ण एडिशन सुरू होईल. या ताज्या घडामोडीमुळे पुण्यातील वृत्तसृष्टीत खळबळ उडाली आहे. त्यामुळेच सकाळपासून माळी आणि त्यांच्या ग्रुपमधील सर्वांचेच फोन `एंगेज' लागतात असा अनेकांचा अनुभव आहे.