जागरण... ब्रेकिंग की फेकिंग न्यूज?

औरंगाबाद - औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात आणि जळगावसह संपूर्ण खान्देशात वृत्तपत्र सृष्टीत एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे जागरणने नाशिकच्या पोतनीसांच्या मालकीचे गांवकरी दैनिक जागेसह विकत घेतले आणि लवकरच जागरण समुहाचे मराठी दैनिक गांवकरी सुरू होणार...
ही ब्रेकिंग न्यूज आहे की, फेकिंग न्यूज आहे, याची खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या दोन दिवसांपासून सुरू केलेला आहे, मात्र अधिकृत दुजोरा अद्यापही मिळालेला नाही.
जिथे भास्कर तिथे जागरण, ही बातमी आम्ही गतवर्षी प्रसिध्द केली होती, त्यावेळी आम्हाला अनेकांनी मुर्खात काढले होते.मात्र आता या वृत्ताची खात्री पटू लागली आहे. जागरण वृत्तपत्र समुहाच्या काही अधिका-यांनी गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात विशेषत: औरंगाबादेत अनेकदा चाचपणी केली.या चाचपणीत त्यांनी महाराष्ट्रातील एखादया दैनिकाशी  भागिदारी करून, मराठी दैनिक सुरू करण्याची कल्पना पुढे आणली.त्यानुसार पुढारीच्या पद्मश्रींबरोबर त्यांची बोलणीही झाली होती, मात्र पद्मश्रींनी नकार दिल्यानंतर मोठया दैनिकाऐवजी छोट्या दैनिकांशी भागिदारी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, आणि त्यांनी गांवकरीशी भागिदारी करण्याचा निर्णय घेतला.पोतनीसांशी चर्चेच्या फे-या झडल्यानंतर आता त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा चालू आहे.
जागरणने औरंगाबाद आणि जळगावची गांवकरीची जागा विकत घेतली असून,अन्य ठिकाणची बोलणीही चालू असल्याची चर्चा वाढली आहे.
फक्त नाशिक वगळता अन्य ठिकाणी गांवकरी दैनिकाची मालकी जागरणची असेल, असा करारही झाल्याची चर्चा चालू आहे.या चर्चेनंतर आम्ही अनेकांशी चर्चा केली.गांवकरीमधील अनेक महत्वाच्या लोकांशीही चर्चा केली.मात्र आमच्याही कानावर आले आहे, मात्र खरे काय आहे, हे आम्हाला माहित नाही, अशी उत्तरे मिळाली.यावरून गावकरीशी भागिदारी झाली की नाही , याची आता तरी खात्री आम्ही देवू शकत नाही...
ऐवढे मात्र खरे की, जागरण लवकरच औरंगाबाद आणि जळगावहून एकदाच सुरू होईल, हे नक्की...मग ते गांवकरीशी भागिदारी करून किंवा स्वत:चे नविन नाव देवून....

जाता - जाता : वंदन पोतनीस यांनी जागरणशी भागिदारी करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.त्यामुळे ही ब्रेकिंग न्यूज आहे की फेकिंग न्यूज आहे, हे लवकरच कळेल...

Post a Comment

0 Comments