पुण्यातील बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी ओवाळून टाकलेल्या `नेक्स्ट' पिढीचे जणुकाही आपणच ठेका घेतल्याच्या अविर्भावात वावरणा-या आनंद आणि त्याच्या अभयसह सर्व साथीदारांना आज का आनंदच्या शेठजींनी घरचा रस्ता दाखवला. त्यांनी मोठ्या विश्वासाने या ग्रुपला आपला नव इंग्रजी पेपर काढण्याचे पूर्णाधिकार दिले होते. त्यासाठी घसघशीत मोबदला मोजला. पण या नेक्स्ट ग्रुपने खाल्ल्या मीठाची जाणीव न ठेवता नागपूरच्या बाबुजींकडून सुपारी घेऊन या शेठजींनी इंग्रजी पेपरमध्ये गुंतवून गाफील ठेवले. त्यामुळे बाबुजींचा हिंदी पेपर पुण्यात जोरात झळकला. त्याचा मोठा दणका आज का आनंद ला बसला. एवढेच नव्हे तर संध्यानंदचे नवे रुपडे वाचकांच्या पसंतीस न उतरल्याने त्याचाही खप झपाट्याने खाली आला. मोठ्या आत्मविश्वासाने इंग्रजी पेपरमध्ये पदार्पण केल्यावर पहिल्या दिवसापासून त्यांना मोठा तोटा सोसावा लागतो आहे. अर्थात शेठजी चतुर आहेत. जुन्या अनुभवाच्या बळावर काही काळाने ते पुन्हा जोमाने उभे राहतील. त्यासाठी त्यांनी सुरुवातही केली आहे. सर्वप्रतहम त्यांनी इंग्रजी वृत्तपत्राची जबाबदारी दिलेल्या आनंद आणि त्याच्या साथीदारांना 1 जुलै पासून काढून टाकले. त्यामुळे संपादीका विनिताही फणकार्याने निघून गेल्या. गेल्या काही वर्षात या ग्रुपने वृत्तपत्र मालकांना लुबाडण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात केले. कायम `पाखमोडें' च्या सहवासात असलेल्या अभयच्या मदतीने आनंदने या नव्या ग्रुपची स्थापना केली. सकाळमध्ये त्यांनी दिड वर्षे भयंकर धुमाकूळ घातला. आपल्या मर्जीतल्या अमित आणि अपर्णाला जगभर फिरवून आणले. महिन्याकाठी लाखभर रुपये मानधन घेणारा अभय आणि केसरीत मोडक्या खुर्चीत बसणारा अभय हे एकच व्यक्ती आहे यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता. पण ती केवळ आनंदच्या मायेची कमाल होती. मात्र, या मंडळींचे उद्योग जसे उघड झाले तसे एका दिवसात सकाळमधील पॉवरबाज अभिजीतने त्यांना तेथून अक्षरश: पळवून लावले. त्यानंतर अशाच भारी गप्पा मारून या ग्रुपने पुढारीकारांनाही गंडा घातला. चाणाक्ष योगेशदादांच्या लक्षात ही फसवेगिरी आली. त्यांनी खास कोल्हापुरी इंगा दाखवून त्यांना तेथून हटवले. एवढेच नव्हे, तर त्यांचे मानधन(?)ही प्रलंबित ठेवून आपण कच्च्या गुरुचे चेले नाहीत हे दाखवून दिले. त्यापाठोपाठ आनंद ग्रुपच्या शेठजींनी या आनंदरावांना गचांडी दिली. आता नागपूरचे बाबुजी या ग्रुपच्या प्रेमात असून पुण्यात दिव्य मराठीला टक्कर देण्यासाठी आपला पेपर अधिक सक्षम करण्याची सुपारी या ग्रुपला देण्याबाबत त्यांची बोलणी सुरू आहेत. त्यामुळे येत्या 1 आगस्टपासून बाविस्करांना या ग्रुपशी सामना करावा लागणार आहे.
0 टिप्पण्या