महिला बीडीओंना सळो की पळो करणारा वार्ताहर

घनसांगवी - भोपाळ शेठच्या पेपरच्या येथील वार्ताहरांने महिला बीडीओंला अनधिकृत कामे करण्यासाठी दबाब टाकला, मात्र त्यांनी नकार देताच, त्यांना त्रास देण्याचा उद्योग या लपूटसुंग्या वार्ताहराने सुरू केला आहे.
नावाला डॉक्टर असलेल्या या वार्ताहराने नेहमीच्या सवयीप्रमाणे महिला बीडीओना अनधिकृत कामे करण्यास सांगू लागला.जालना जिल्ह्यात सर्वात स्वच्छ प्रतिमा असलेल्या या महिला बीडीओने तत्कालीन जालना ब्युरो चिफकडे तक्रार केली.मग ब्युरो चिफने संबंधितांना झालेला प्रकार सांगितला, तर तुला काय करायचे आहे, त्याला काय करायचे आहे ते करू दे म्हणून त्यालाच झापण्यात आले.
मग काय, या वार्ताहराला अधिक बळ आले.मग त्याने या महिला बीडीओला सळो की पळो करून सोडले आहे.घनसांगवीचा वार्ताहर व औरंगाबादेत बसलेल्या संबंधितांमध्ये साटेलोटे असल्याची उघड चर्चा जालना जिल्ह्यात चालू आहे.घनसांगवीच्या वार्ताहराला कंटाळलेल्या या महिला बीडीओ आता चक्क स्टेट इडिटरकडेच तक्रार केल्याचे समजते.त्यानंतर मात्र संबंधिताचे धाबे दणाणले आहे.

Post a Comment

0 Comments