'लोकमत'ला जळगावात माणसे मिळेनात!

जळगाव - दुप्पट पगाराचे आमिष दाखवूनही अखेर 'लोकमत'ला जळगावात 'दिव्य' किंवा 'सकाळ'मधला एकही माणूस फोडता आला नाही. शेवटी गेल्या महिनाभरापासून चालविलेली बहुचर्चित मुलाखत प्रक्रिया गुरुवारच्या मुलाखतीनंतर थांबविण्यात आली. विजय कोळी या 'देशदूत' मधील शिकाउ वार्ताहराला 6000 वरून 11000 रुपये पगार देण्यात आलाय.  याशिवाय 'दिव्य मराठी'मध्ये चकरा मारून व ग्रामीण आवृत्तीची वाट पाहून थकलेले 'पुण्यनगरी'तील ट्रेनी प्रशांत भदाणे यांनाही जेमतेम पाच आकडे गाठणारा दुप्पट पगार दिला गेलाय. शेवटी देशदूत व पुण्यनगरी अशा दुय्यम फळीतील माणसांना संधी देवून आता 'लोकमत' मैदानात उतरून 'दिव्य'शी दोन हात करू पाहणार आहे. 'दिव्य' आव्हानाशी मुकाबला करण्यात 'विजयी' होवू शकणारच संपादक हवा होता, अशी आता 'लोकमत'मध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे व्यवस्थापनही गृपमधीलच कुणाला 'बावि' (सॉरी भावी) संपादक म्हणून सोयी'स्कर'पणे आणावे की नवा, ताज्या दमाचा गडी पाहावा, यावर खल करीत आहे. जळगाव-पुणे-औरंगाबाद गाजवून परतलेले आणि जळगाव-अकोला-अमरावती-नाशिक असे खानदेश-विदर्भ फिरून आलेलेही 'प्रवासी संपादक' होवू पाहताहेत... अशा स्थितीत मग घराच्या माणसांपेक्षा बाहेरचेच बरे, यातच 'विजय' मानणारीही  मंडळी आहे. शेवटी काय होते, ते लवकरच दिसेल...  

दिव्य मराठीमुळे खपावर परिणाम झाल्यामुळे लोकमतची तडफड सुरू झाली असून,त्यातून सावरण्यासाठी अंकाची किंमत 3 रूपयाऐवजी 2 रूपये केली आहे. शिवाय वृत्तपत्र विक्रेत्यासाठी वेगवेगळ्या आकर्षक स्कीम राबविण्यास सुरूवात केली आहे.

आजपर्यंत क्र.1 वर असलेल्या लोकमतला दिव्य मराठी हा जबरदस्त स्पर्धक मिळाला आहे. दिव्य मराठीमुळे प्रिंट मीडियातील कर्मचाऱ्यांच्या पगारीही वाढल्या आहेत, हेही नसे थोडके...

Post a Comment

0 Comments