प्रिंट मीडियात ले -आउट आरटीस्टची चलती...

मुंबई -  प्रिंट मीडियात सध्या ले -आउटची  चांगलीच चलती आहे. वर्तमानपत्रात मजकुरासोबत आखणी, मांडणी हे हि वाचकांचे आकर्षण असल्याने त्या कलेला उपजत असणाऱ्या  ले -आउट आरटीस्टचे ' सोनियाचे दिनू ' आहे. वर्तमानपत्रात दशकभरापूर्वी  विदर्भातील ' देशोन्नती ' ने   ले -आउट  मध्ये दमदार पाऊल टाकले. त्या पाठोपाठ मुंबईतील आपलं महानगर, नवभारत, मिड-डे यांनीही धडाकेबाज ले -आउट देण्यास सुरवात केली. महाराष्ट्र टाइम्सने हि त्यात उडी घेतली. मुंबईत ले -आउट मध्ये ' पट्टी ' चे असलेले ले -आउट आरटीस्ट  प्रदीप म्हापसेकर ( सध्या प्रहार मध्ये कार्यरत ) यांनी ले -आउटची ' रंगीन दुनिया ' अनेक वर्तमान पत्रांना दाखवली; अन मग सुरु झाली रस्सीखेच..! इंग्रजी वर्तमान पत्रासोबत मग मराठी वर्तमानपत्रात तोडीस तोड ले -आउटचा  कलगीतुरा रंगला.
 सध्या मुंबईत हातावरच्या बोटावर मोजण्या इतपत ' मास्टर माइंड ' ले आउट आरटीस्ट आहे. त्यात प्रामुख्याने नाव घेतले जाते प्रदीप म्हापसेकर यांचे. राणेंच्या ' शब्दाला सत्याची धार ' असलेल्या ' प्रहार ' मध्ये  त्यांनी   ले -आउटची रंगत चांगलीच  दाखवली सध्या तरी मराठी दैनिकात ' प्रहार ' ची चांगलीच चलती आहे. (तसा 'दिव्य मराठी' हि ले -आउटच्या रिंगणात आहे.)  म्हापसेकरांपाठोपाठ 'आपलं महानगर' चे दिलीप पवार, पहिले 'लोकमत' ला असलेले आणि आता मुंबई 'सकाळ'  मध्ये कार्यरत असलेले अनिल कुसुंबे, 'कृषीवल'चे सुनील आढाव यांच्याही कलेला तोड नाही. यांच्यासोबत आणखी नवे चर्चेत येतात ते म्हणजे बिपीन आडागले, कुणाल जाधव , नितीन शिंदे, चांदणी सावंत , अमर मर्ढेकर, अजय जाधव, संजय कदम, मिलिंद नार्वेकर हे हि मुंबई , ठाण्यातल्या दैनिकामध्ये आपल्या कलेचा कित्ता गिरवत आहे. मालकवर्गाने देखील आपल्या वर्तमानपत्रांच्या आखणी, मांडणीला प्राधान्य दिल्याने (काही ठोकळेबहाद्दर वर्तमानपत्र वगळता) ले -आउट आरटीस्टची चांगलीच दिवाळी आहे. मुंबईतील अनेक दैनिकांत उपसंपादक, मुख्य उपसंपादक, वृत्त संपादकांपेक्षा  ले -आउट आरटीस्टच्या पगाराची रक्कम सरशी आहे. त्यात अनेकांचे पगारपाणी विशी ते पन्नाशीच्या घरात आहे. त्यामुळे साहजिकच ले -आउट आरटीस्टला प्रिंट मीडियात चांगलीच चलती आहे....

 जाता - जाता : सध्याच्या काळात  बातमीसोबत ले -आउटला खूपच महत्व आल्याने या क्षेत्रात येणाऱ्याना चांगलाच वाव आहे. पण वर्तमानपत्रात  ले -आउट च्या बाबतीत बोलावे तर आरटीस्टने ' बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल ' अशी परिस्थिती आहे. 

Post a Comment

0 Comments