कन्हैया खंडेलवाल |
मुंबईच्या समर्थन संस्थेच्या वतीने 1996 पासून दरवर्षी राज्यातील तीन पत्रकारांना मानवी हक्क वार्ता पुरस्कार देण्यात येतो.दलित,अदिवासी समाजावर तसेच महिलावर होणाऱ्या अन्याय - अत्याचारासंदर्भात वार्तांकन करणाऱ्या तसेच कुपोषण,भ्रुणहत्त्या आदी गंभीर विषयावर बातम्या,लेख,फिचर्स देणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येतो.रोख 5 हजार रूपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.सन 2011 च्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.त्यात जितेंद्र पराडकर (दै.सामना,संगमेश्वर) गजानन पाटील (दै.लोकमत,सांगली),कन्हैया खंडेलवाल (आय.बी.एन.-लोकमत, हिंगोली) यांचा समावेश आहे.उत्तेजणार्थ पुरस्कार,प्रदीप गरूड (दै.आपला महाराष्ट्र,नंदूरबार), सुर्यकांत नेटके (दै.सकाळ,अहमदनगर) यांना घोषित करण्यात आले.
परिक्षक म्हणून अलिबागच्या दैनिक सामनाच्या पत्रकार सौ.शारदा धुळप,सोलापूरचे लोकसत्ताचे पत्रकार एजाजहुसेन मुजावर,मुंबईचे सहारा समयचे रिपोर्टर संजय पिळणकर यांनी काम पाहिले.
मराठवाडयातून यापुर्वी उत्तम हजारे (बीड),सुनील ढेपे (उस्मानाबाद),जयप्रकाश दगडे (लातूर) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,हे येथे उल्लेखणीय.
0 टिप्पण्या