मुंबई - मंत्रालय वार्ताहर संघाचे पत्रकार नुकतेच बिहारच्या दौ-यावर जाऊन आले. दौरा
यशस्वी झाला. नितीशकुमार यांनी विकासाचा ढोल महाराष्ट्रात पिटला जावा
म्हणून मुंबई प्रतिनिधींवर प्रभाव टाकला खरा पण यात नेमकी मेख अशी की बिहार
राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, हा मुद्दा ते पुढे करत आहेत,
म्हणजे, विकासाच्या नावाने उद्या लालूंनी बोंब मारली की केंद्र हा दर्जा
देत नसल्याची पळवाट काढायला नितीशकुमार मोकळे. पण हे आमच्या
महाराष्ट्राच्या पत्रकांच्या लक्षात आले नाही, म्हणून त्यांनी त्यावर भाष्य
केलेले नाही. लालूंनी मात्र फिरक्या घेतल्याचे कानावर आले. राजन पारकर
यांनी ट्रेनिंग घेण्याचा सल्ला दिला तर शकील यांना अजून काही. दुबे, मिश्र,
तिवारी यांनी तर आपल्या राज्यात मनसोक्त मजा केली. या शिष्टमंडळात सामनाचे
योगेश त्रिवेदी, नवशक्तीचे प्रकाश सावंत, लोकसत्ताचे स्वप्न सौरभ,
महानगरचे प्रवीण पुरो, युगधर्माचे अशोक शिंदे, विनय खरे, पब्लिसिटी चे
नितीन शिंदे, मसुरकर आदी सहभागी होते. विशेष म्हणजे मंत्रालय वार्ताहर
संघाचा एकही पदाधिकारी सोबत नव्हता. त्यामुळे बिहार दौरा हा तिथे
गेलेल्या प्रतिनिधींनी स्वत: नेता असल्याचे समजून पार पडला. त्यांनी बिहार
चा अभ्यास केला खरा पण तितकीच मजादेखील. अधिक माहिती विन्या सांगेल. अजून
काही गोष्टी आहेत. आतल्या गोटातून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
लवकरच सांगू.