मुंबई - सध्या पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्यात. डॉ.रावसाहेब मगदूम यांचे दै.व्हिजन वार्ताची चांगलीच सफर सुरु झालीये. महाराष्ट्रातील अख्या प्रिंट मिडियाचे दै.व्हिजन वार्ताकडे लक्ष लागून आहे. तिकडे मुंबई पुढारीत गिरधारी हि चांगलेच रूळलेत . तर अदलाबदली झालेले विनायक पाथ्रुडकर मुंबई लोकमत च्या खुर्चीवर बसून आपल्या पत्रकारांना मार्गदशन करताय. स्टार माझाचा ' प्रसन्ना ' सध्या चांगलाच आघाडीवर आहे . त्याचा तजेलदार चेहरा , अभ्यासही दांडगाच आहे म्हणा.. इतर ' पुचाट ' टोक शो पेक्षा त्याच्या ' टोक शो ' ला अनेकांची पसंती आहे. मिलिंद भागवतला हि तशीच कला आहे म्हणा. ' जय महाराष्ट्र ' चॅनेल दीपावलीत सुरु होत असल्याची राळ आहे. पण त्यांचेहि गेल्या वर्षभरापासून ' लांडगा आला रे आला ..' असेचसे काही होणार आहे. मात्र या चॅनेलममध्ये असलेल्या प्रितीच्या राज्यामुळे अनेकांनी जय महाराष्ट् केलाय. सध्या प्रितीही झी 24 तासमध्ये संधी मिळते का म्हणून प्रयत्न करीत आहे.
गोंडखैरी येथील देशोन्नती पिंट्रिंग प्रेससमोरील गोळीकांडप्रकरणी देशोन्नतीचे एडिटर इन चीफ आरोपी प्रकाश गोपाळराव पोहरे यांना पोलीस कोठडी दिली. यावरून अकोला परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. तर महाराष्ट्र संपादक परिषद हि काहीसी अस्वस्थ आहे . तिकडे मुंबईत मंत्रालयातील पत्रकार नुकताच औरंगाबाद दौरा करून आलेत. सुप्रिया सुळेच्या लेक लाडकी अभियानाच्या समारोपाला अगदी खास विमानाने पत्रकार जाऊन आले. फेसबुकवरहि बेरक्या पेज ची पसंती वाढलीये. जर्नालीसमचे अनेक विध्यार्थी त्याला लायिक करत आहे. नवशक्तीने पैश्याच्या बाबतीत जरासा आकसता हाथ घेतला आहे . अनावश्यक खर्चाच्या भानगडी कमी केल्यात. अमेरिकेतील बहुचर्चित अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वार्तांकनासाठी दिव्य मराठीचे संपादक कुमार केतकर, प्रहारचे महेश म्हात्रे अमेरिकेच्या दौर्यावर गेलेत... मुंबईत टीव्ही ९ ने अनेक शकला लढवून सर्वसामान्यांशी चांगलीच नाळ जोडलिये... त्याच्या पावलावर पाऊल झी २४ तासने ठेवले आहे. प्रिंट मीडियात नेहमीप्रमाणे डीटीपी ऑपरेटरची तंगी कायम आहे. सध्या पत्रकारीतले अनेक मंडळी कंटेंट रायटिंग , पीआर क्षेत्राकडे वळतायत. कारण तिकडे पगारपाणीहि भरपूर मिळतोय. ( काय करणार महागाईच्या जमान्यात पत्रकारितेतला तुटपुंजा पगार लगेच खपतो ) ठाण्यात झटपट सुरु झालेल्या दैनिकांची चमकेशगिरी कमी झालीये. आले तेवढे लागलीच आर्थिक टंचाईत आहेत. दुसरीकडे रायगडच्या दै कृषीवल मध्ये
जरा कामगारांची काहीतरी गडबड दिसतेय.... पुण्यात दै. लोकनायकला हवा तसा
प्रतिसाद मिळाला नाही. दै. बहुजन महाराष्ट्रला ओवरटेक करायचा लोकनायकचा
डाव फसलेला दिसतोय ? सध्या डिग्र्या घेऊन नवखी आलेली पत्रकार मंडळी
साप्ताहिके अन जिल्हा दैनिकात रुजू झालीत. स्टार पत्रकार होण्याचे अनेकांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय. कारण सध्या मोठ्या दैनिकांत गेल्या वर्षभरापासून जागा निघाल्या नाहीत. महाराष्ट्र टाईम्स च्या
मेट्रो एडिटर असलेले प्रवीण मुळ्ये मुंबई टाईम्स हि पुरवणी चांगलीच गाजवत
आहे . तरुणाईच्या त्या पुरवणीसाठी उड्या पडत आहे. पण मटाला 'कॉलेज क्लब
रिपोर्टर ' महाग पडण्याची शक्यता आहे. कारण सार्वजनिक जीवनात हे 'कॉलेज क्लब रिपोर्टर ' मटाचे कार्यालयीन प्रतिनिधी सारखे वावरत असल्याचे आमच्या कानावर आहे. तूर्तास तरी एवढेच !
- नारायण .. नारायण ..!
- नारद
गोंडखैरी येथील देशोन्नती पिंट्रिंग प्रेससमोरील गोळीकांडप्रकरणी देशोन्नतीचे एडिटर इन चीफ आरोपी प्रकाश गोपाळराव पोहरे यांना पोलीस कोठडी दिली. यावरून अकोला परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. तर महाराष्ट्र संपादक परिषद हि काहीसी अस्वस्थ आहे . तिकडे मुंबईत मंत्रालयातील पत्रकार नुकताच औरंगाबाद दौरा करून आलेत. सुप्रिया सुळेच्या लेक लाडकी अभियानाच्या समारोपाला अगदी खास विमानाने पत्रकार जाऊन आले. फेसबुकवरहि बेरक्या पेज ची पसंती वाढलीये. जर्नालीसमचे अनेक विध्यार्थी त्याला लायिक करत आहे. नवशक्तीने पैश्याच्या बाबतीत जरासा आकसता हाथ घेतला आहे . अनावश्यक खर्चाच्या भानगडी कमी केल्यात. अमेरिकेतील बहुचर्चित अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वार्तांकनासाठी दिव्य मराठीचे संपादक कुमार केतकर, प्रहारचे महेश म्हात्रे अमेरिकेच्या दौर्यावर गेलेत... मुंबईत टीव्ही ९ ने अनेक शकला लढवून सर्वसामान्यांशी चांगलीच नाळ जोडलिये... त्याच्या पावलावर पाऊल झी २४ तासने ठेवले आहे. प्रिंट मीडियात नेहमीप्रमाणे डीटीपी ऑपरेटरची तंगी कायम आहे. सध्या पत्रकारीतले अनेक मंडळी कंटेंट रायटिंग , पीआर क्षेत्राकडे वळतायत. कारण तिकडे पगारपाणीहि भरपूर मिळतोय. ( काय करणार महागाईच्या जमान्यात पत्रकारितेतला तुटपुंजा पगार लगेच खपतो ) ठाण्यात झटपट सुरु झालेल्या दैनिकांची चमकेशगिरी कमी झालीये. आले तेवढे लागलीच आर्थिक टंचाईत आहेत. दुसरीकडे रायगडच्या दै कृषीवल
- नारायण .. नारायण ..!
- नारद